नक्षलविरोधी पोलिस जवानांच्या कुटुंबीयांना शेतीसाठी पाच एकर जमीन देणार- गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

88
विदर्भ वतन न्यूज पोर्टल नागपूर
  • गृहमंत्री यांचा मंत्रीमंडळापुढे प्रस्ताव

नागपुर/गडचिरोली – नक्षलविरोधी झालेल्या अभियानात लढताना शहीद झालेल्या पोलिस जवानांच्या कुटुंबीयांना शेतीसाठी पाच एकर जागा देण्यासह इतर मागण्यांचा प्रस्ताव मंत्रिमंडळापुढे ठेवण्यात येईल, अशी ग्वाही गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी येथे दिली़ शनिवारी झालेल्या चकमकीत सहभागी पोलीस अधिकारी आणि सी-६० कमांडोंच्या सत्कारासाठी गृहमंत्री पाटील सोमवारी गडचिरोली येथे आले होते़ पोलिस अधीक्षक कार्यालयात त्यांनी शहीद पोलिसांच्या कुटुंबीयांशी संवाद साधला़ चकमकीत जखमी चार पोलिस जवानांची त्यांनी नागपूरच्या आँरेंंज सिटी हाँस्पिटलमध्ये भेट घेतली़ शौर्य गाजवणा-या जवानांना मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन आणखी बक्षिसे व पुरस्कार दिला जाईल, असे त्यांनी सांगितले़ पालकमंत्री शिंदे यांनी पोलिसांना ५१ लाखांचे बक्षीस जाहीर केले़ चकमकीत सहभागी जवानांना जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून हे बक्षीस दिले जाणार आहे़ शासानाच्या नियमानुसार जे काही रिवाँर्ड मिळतात ते मिळतीलच, पण पोलिसांचे मनोबल वाढावे यासाठी हे तत्काळ स्वरुपातील बक्षीस असल्याचे त्यांनी गडचिरोलीत सांगितले़