Home Breaking News तुमसरकडून तिरोड्याकडे येणा-या चारचाकी वाहनाने एकाच कुटुंबातील तिघांना चिरडले, मुलाचा मृत्यू तर...

तुमसरकडून तिरोड्याकडे येणा-या चारचाकी वाहनाने एकाच कुटुंबातील तिघांना चिरडले, मुलाचा मृत्यू तर वडील व बहीण जखमी

27 views
0
विदर्भ वतन न्यूज पोर्टल नागपूर

गोंदिया – लग्नाची वरात घेउन तुमसरकडून तिरोड्याकडे येणा-या चारचाकी वाहनाने मॉर्निंग वॉक करीत असलेल्या एकाच कुटुंबातील तिद्यांना पाठीमागून जोरदार धडक दिली. घटनेत मुलगा ठार झाला तर त्याची बहीण व वडील जखमी झाले. ही घटना राधेलाल पटले यांच्या गणेश पेट्रोल पंपासमोर शनिवार ( दि़ १३) रोजी पहाटे ५.३० च्या सुमारास घडली. निखिल राजू उपकर (३२, रा. साई कॉलनी, तिरोडा) असे मृतकाचे नाव आहे, तर जखमींमध्ये बहीण नेहा राजू उपरकर (२९) व वडील राजू हरिलाल उपरकर( ६०, रा. साई कॉलनी) यांचा समावेश आहे.  माहितीनुसार निखिल, नेहा व वडील राजू हरिलाल उपरकर हे तिन्ही बापलेक नेहमीप्रमाणे शनिवारी सकाळी ५ वाजता मॉर्निंग वॉक करण्यासाठी घरुन निघाले. ते बिर्सीकडे जाणा-या मुख्य मार्गाने धापेवाडा प्रकल्पाच्या कार्यालयापर्यंत पायी जाउन घराकडे परत येत होते़ दरम्यान, सकाळी ५.३० वाजेच्या सुमारास राधेलाल पटले यांच्या पेट्रोल पंपासमोर तुमसरकडून तिरोड्याकडे येणा-या चारचाकी वाहन अर्टिका, एमएच-४९/बीके-९१२५ च्या चालकाने आपल्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने चालवून तिघांना पाठीमागून जोरदार धडक दिली.
ही धडक एवढी जोरदार होती की, यात निखिल उपरकर १० फूट दूर फेकला गेला़ त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली़ तसेच त्याच्या डाव्या पायाचे पूर्ण हाड मोडले. त्यामुळे तो गंभीर जखमी झाला, तर नेहा उपरकर हिला चारचाकी घासत गेल्याने तिच्या उजव्या पायाला जखम झाली. तसेच अवघ्या तीन फुटांवर पुढे पुढे जात असलेले राजू उपरकर यांच्या कमरेला आणि गुडघ्याला मार लागला़. तिथून ते चारचाकी वाहन पुढे जात असताना वडील राजू उपरकर यांनी मागे वळून पाहिले. तेव्हा क्षणभर मुलगा व मुलगी दिसले नाहीत. नंतर मुलगी खाली पडलेल्या अवस्थेत असताना मुलीला उचलले व निखिल कुठे आहे हे मुलीला विचारले. त्यावेळी समोर निखिल अंदाजे दहा फूट दूर अंतरावर पडून होता़ त्यापाठोपाठ येत असलेल्या लग्नातील पाहुण्यांच्या गाडीला थांबवून जखमींना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
डाँक्टरांनी निखिलची तपासणी करुन मृत घोषित केले. जखमी वडील व बहिणीवर औषधोपचार करुन सुटी देण्यात आली. तिरोडा उपजिल्हा रुग्णालयात निखिलच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करुन मृत घोषित केले. जखमी वडील व बहिणीवर औषधोपचार करुन सुटी देण्यात आली़ तिरोडा उपजिल्हा रुग्णालयात निखिलच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली. भाष्कर हरिलाल उपरकर (रा. भूतनाथ वॉर्ड, तिरोडा) यांच्या तक्रारीवरुन तिरोडा पोलिसांनी वाहन चालकाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपासणी सहायक पोलिस निरीक्षक अभिजीत जोगदंड करीत आहेत.