Home नागपूर पेट्रोल – डिझेलवरील कर कमी करावे यासाठी भाजपा कार्यकर्त्यांकडून आंदोलन

पेट्रोल – डिझेलवरील कर कमी करावे यासाठी भाजपा कार्यकर्त्यांकडून आंदोलन

29 views
0
विदर्भ वतन न्यूज पोर्टल

नागपूर – केंद्र सरकार प्रमाणेच महाराष्ट्र सरकारनेही पेट्रोल आणि डिझेलवरील कर कमी करावेत, या मागणीसाठी आज नागपुरात भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलन केले़ केंद्राच्या निर्णयानंतर देशातील बहुतांश राज्यांनी पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्य कमी केली आहे़ परंतु महाराष्ट्रात परिस्थिती तशीच आहे़ इतर राज्यांकडे पाहता राज्य सरकारनेही जागे व्हावे, पेट्रोल आणि डिझेलवरील व्हँट कमी कराव्यात, अशी मागणी करण्यात आली़

यावेळी बोलताना, भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे म्हटले की, केंद्र सरकारने दर कमी केल्यानंतरच अनेक राज्यातील सरकारने दर कमी केले आहे़ यामुळे नागरिकांना दिलासा मिळालेला आहे़ मात्र, राज्य सरकार दर कमी केले नाही़ राज्यात पेट्रोल आणि डिझेल १२ ते १५ रू पयांनी महाग विकले जात आहे़ केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क ५ रुपये आणि १० रुपयांनी कमी केले़ त्यानंतरही काही राज्यांनीही पेट्रोल आणि डिझेलवरील व्हँट कमी केला़ त्यामुळे, नागरिकांना वाढत्या महागाईत थोडे का होईना पण दिलासा मिळाला़ मात्र, महाराष्ट्रात अघाप कर कमी केलेले नाहीत़ राज्य सरकारने पेट्रोल डिझेल लावलेले कर कमी केलं तर महाराष्ट्राच्या जनतेला दिलासा मिळेल, अशी मागणी यावेळेस करण्यास आली़