Home नागपूर विकास शुल्कात दरवाढीचे चटके, तिप्पट पटीने वाढ

विकास शुल्कात दरवाढीचे चटके, तिप्पट पटीने वाढ

29 views
0

विदर्भ वतन न्यूज पोर्टल नागपूर

नागपूर – महागाईच्या वाढत्या प्रमाण होत असलेल्या सर्वसामान्यांना सरकारकडून दिलासा मिळण्याऐवजी दरवाढीचे चटके मिळत आहेत़ आता घर बांधण्यासाठी भूखंड घेणे अधिकच महाग होणार आहे़ कारण महाविकास आघाडी सरकारने विकास शल्कात तिप्पट वाढ केली़ परिणामी नागरिकांना ५६ ऐवजी १६८ रुपये शुक्ल मोजावे लागणार आहे़ शहरातील अनियमित भूखंड नियमितीकरणासाठी गुुंठेवारी कायदा लागू करण्यात आला आहे़ याकरिता ५६ रुपये प्रति चौरस फूट शुल्क नियमीतीकरणासाठी घेण्यात येत होते़ नागपूर सुधार प्रन्यासच्यावतीने शहरात अनधिकृत भूखंडाचे नियमीतीकरण केले जात आहे़ स्वस्त भूखंड घेउन घरकूल उभारल्यानंतर विकास शुक्ल आकारल्या जात असल्याने जनतेमध्ये प्रचंड रोष आहे़ विकास शुल्क भरल्यानंतरही सर्व सुविधा मिळेलच याची खात्री नाही़ फक्त कागदोपत्री आऱ एल़ एक शिक्का मारला जातो़ हा शिक्का असल्याशिवाय बँकेचे कर्जही मिळत नाही़ त्यामुळे माफक शुल्क नियमितीकरणासाठी आकारण्यात यावे अशी मागणी जनतेची होती़ सध्या गुंठेवारी अंतर्गत नियमितीकरणाची मुदत २००१ वरुन २०२० पर्यंत वाढवण्यात आली आहे़ पाच ते सात लााखांच्या हजार फुटाच्या भूखंडासाठी दीड ते पावणे दोन लाख रुपये वाढीव शुल्कामुळे नागरिकांना भरावे लागणार आहे़ भूखंडधारकांच्या सोयीसाठी गुंठेवारीची मुदत वाढवल्याचे महाविकास आघाडी सरकारच्यावतीने सांगण्यात येत आहे़ मात्र, विकास शुल्कात तीनपट वाढ करुन आघाडी सरकार जनतेची लूटमार करीत असल्याचा आरोप आमदार कृष्णा खोपडे यांनी केला आहे़ इंधन तसेच इतर महागाईवर गळे काढताना महाविकास आघाडीचे नेते व वाढीव गुुंठेवारी शुल्कावर का बोलत नाही, असाही सवाल खोपडे यांनी केला आहे़