Home नागपूर फटाके फोडण्याच्या वाद निर्माण झाल्यास महिलेचा विनयभंग

फटाके फोडण्याच्या वाद निर्माण झाल्यास महिलेचा विनयभंग

0
फटाके फोडण्याच्या वाद निर्माण झाल्यास महिलेचा विनयभंग
विदर्भ वतन न्यूज पोर्टल नागपूर

नागपूर – फटाके फोडण्याच्या वादातून एका महिलेच्या विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. संदीप जोशी (३६) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्या परिसरातील एका महिलेसोबत त्याचा फटाक्यांवरून वाद निर्माण  झाला. यावेळी त्याने या महिलेचे विनयभंग केल्याचा आरोप या महिलेने केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

फटाके फोडण्याच्या वादातून मारहाणीच्या दोन घटना
फटाके फोडण्यावरून झालेल्या वादातून मारहाणीच्या दोन घटना शहरात घडल्या. पहिली घटना बजाजनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील लक्ष्मीनगर झोपडपट्टी परिसरात गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास घडली. कौशिक धनराज सोमकुंवर (२०) असे फिर्यादीचे तर साहील विक्रम उबाळे (१८) असे आरोपीचे नाव आहे. कौशिक फटाके फोडत होता. मात्र, आरोपी साहील त्याला शिवीगाळ करू लागला. यावरून दोघांमध्ये वाद सुरू झाला. हा वाद वाढत गेला. त्यानंतर चिडलेल्या साहीलने रस्त्यावरील दगड उचलून कौशिकला मारहाण  केली.

याखेरीज, दुसरी घटना जुनी कामठी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नेताजी चौक परिसरात घडली. महेश रुपलाल भोटानी आणि राकेश शर्मा यांच्यात हा वाद झाला. राकेश हा भोटानी यांच्या घरासमोर फटाके फोडत होता. यावेळी महेशचा भाऊ नरेश याने त्यावर आक्षेप घेतला. घरासमोर फटाके फोडू नको असे नरेश याने राकेश याला सांगितले. यावरून त्यांच्याच वाद झाला. हा वाद वाढत गेला. त्यानंतर राकेश आणि त्याच्या अन्य तीन मित्रांनी महेश आणि नरेश यांना मारहाण केली. तसेच भोटानी बंधूनी आपल्याला मारहाण केल्याची तक्रार राकेशने केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही गटांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.