अभ्यंगस्नान (कविता )

211
विदर्भ वतन न्यूज पोर्टल नागपूर
      अभ्यंगस्नान
पहाटे सकाळी।पहिली अंघोळी ।
आनंदी दिवाळी। सण खास ।।
उटण्याची पूडी।स्निग्ध दूध गोडी।
तेल धार सोडी ।मिश्रणात ।।
हिवाळ्याची झळ।सुरू धावपळ ।
उटण्याची मळ ।काढी ताई।।
उटणे लावते । अंगास माखते। 
पूर्णांग चोळते ।स्नानापूर्वी ।।
मळ करी दूर ।उष्ण जल धार ।
कांती तेजदार ।अभ्यंगाने ।।
तन सुगंधित।मन प्रफुल्लित ।
नाती उल्हासित। या समयी ।।
त्वचा निगा तत्व।अभ्यंगा महत्व।
अभंग कवित्व । हे युवाचे ।।
श्री.युवराज गोवर्धन जगताप
     काटेगाव ता :- बार्शी
      जिल्हा:- सोलापूर
       8275171227