
विदर्भ वतन न्यूज पोर्टल नागपूर
नागपूर – आमदार राजू पारवे यांच्या अध्यक्षतेखाली उमरेड, कुही व भिवापूर तालुका क्रीडा संकुल विभागाची आढावा बैठक घेतली. दि. 2/11/2021 रोज मंगळवार ला उमरेड विधानसभा क्षेत्राचे आमदार राजू पारवे यांच्या अध्यक्षतेखाली उमरेड, कुही व भिवापूर तालुका क्रीडा संकुल ची आढावा बैठक घेण्यात आली.उमरेड विधानसभा क्षेत्रातील खेडाळू हा राष्ट्रीय पातडीवर खेळला पाहिजे या करिता सुरु असलेल्या उर्वरित क्रीडा संकुलचे काम पूर्ण करण्याकरिता अधिकार्यांना सांगण्यात आले.क्रीडा संकुल येथे रनींग ट्रक, स्केटिंग व हॉलि्बॉल ट्रक तयार करण्यास सांगितले तसेच पाण्याची, इलेक्ट्रिकची व्यवस्था करण्याचे आदेश दिले. तयार झालेल्या बॅडमिंटन स्टेडियम वर टरबो लावण्याचे आदेश दिले.मा. आमदार मोहद्याच्या अध्यक्षतेत भिवापूर क्रीडा संकुल ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर नाव देण्यात आले तसेच उर्वरित कामा करिता नवीन प्रस्ताव तयार करण्यास सांगितले. खेळाळू क्रीडा संकुलमध्ये खेळण्याकरिता आले पाहिजे या करिता सर्व सुविधा लवकरात लवकर तयार करण्याचे आदेश दिले.
या वेळी उपविभागीय अधिकारी खंडाईत, तहसिलदार तीनघसे, पुंडेकर, क्रीडा अधिकारी मेश्राम, नायब तहसील वरपे, तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

