आप चे वीज कनेक्शन कापण्याविरुद्ध विजमंत्री कर्यालयवार दिवा-कंदील आंदोलन

171
विदर्भ वतन न्यूज पोर्टल नागपूर
  • कोरोना महामारी मुळे आर्थिक संकटात असलेल्या नागरिकांचे वीज कनेक्शन कपात बंद करा – आप
  • मुख्यमंत्री महोदय 300 युनिट स्वस्त विज देण्याचे वचनपुर्ती करा

नागपूर – दि.०१/११/२०२१ विज मंत्री मा. नितीन राऊत यांच्या कार्यालयासमोर आम आदमी पार्टीने दिवा-कंदील आंदोलन केले. यावेळी नितिन राउत व मुख्यमंत्री यांच्यावर रोष व्यक्त करीत घोषनबाजी करण्यात आली. हे आंदोलन विदर्भ संयोजक देवेंद्र वानखेडे व राज्य कोषाध्यक्ष जगजीत सिंग यांच्या नेतृत्वात होते. या आंदोलनात प्रामुख्याने राज्य सहसचिव अशोक मिश्रा, राष्ट्रीय परिषद सदस्य अमरीश सावरकर, नागपूर संयोजिका कविता सिंगल, नागपूर संघटनमंत्री शंकर इंगोले, नागपूर सचिव भूषण ढाकुलकर, सहसंयोजक राकेश उराडे, युवा राज्य समिति सदस्य कृतल आकरे प्रामुख्याने उपस्थित होते.

आपणा सगळ्यांना माहितच आहे की कोविड-१९ महामारी दरम्यान लॉकडाऊनमुळे राज्यात मार्च ते जून २०२० व २०२१ दरम्यान नागरिकांचा पूर्णपणे रोजगार बंद होतो. यामुळे आजपर्यंत जनता यामधून बाहेर पडलेली नाही. परंतु महावितरण कडून लॉकडाऊन काळात दि.१ एप्रिल २०२० पासून २०% वीज दर वाढ करण्यात आली. राज्यातील जनतेजवळ पैसाच नसल्यामुळे विजेची मोठ्याप्रमाणात आलेली वीजबिल भरण्यास नागरिक असमर्थ आहेत. असे असतांना सरकार मात्र बिल न भरू शकलेल्या जनतेच्या थकीत बिलावर मोठ्या प्रमाणात व्याज लावत आहे, तर बिल न भरल्यास वीज खंडित करीत आहे, जे अन्यायकारक व अमानवीय आहे.
लोकांनी मागील दोन वर्षातील दिवाळी कोरोना महामारीच्या अंधारात साजरी केली. आता कोरोना थैमानाची  तीव्रता कमी झाल्यामुळे जनतेनी दिवाळी मोकळ्या मनाने साजरी करण्याची तयारी आहे, परन्तु वीज वितरण कंपन्यांनी लोकांची वीज कनेक्शन कापण्याची महा मोहीम चालू केली आहे. ही मोहीम त्वरित थांबवण्यात यावी, या वर्षी तरी लोकांच्या घरात दिवाळीला अंधार करू नका, असे विधर्भ संयोजक देवेंद्र वानखेड़े यांनी म्हटले.
मा उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकी पूर्वी राज्यातील जनतेला वचन दिले होते की आमचे सरकार आल्यास आम्ही ३०० युनिट घरगुती वापरात ३०% स्वस्त वीज देवू. तसेच काँग्रेस-राष्ट्रवादीच्या शपथ नाम्या प्रमाणे औद्योगिक विजेचा दर अन्य राज्यांशी स्पर्धात्मक ठेवण्यासाठीचे आश्वासन देण्यात आले होते. यानंतर आपण सुद्धा मागील दिवाळी पूर्वी वीजबिल सवलत देऊन दिवाळी गिफ्ट देण्याची घोषणा केली होती. तर राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्याचे मा उपमुख्यमंत्री यांनी जनतेची वीज कापणार नसल्याची घोषणा केली होती. ह्या सर्व घटनांमुळे राज्यातील आर्थिक संकटात सापडलेली जनता आणखीच संभ्रमात पडली आहे.  हा मुद्दा अधिक न ताणता आर्थिक कोंडीत सापडलेल्या सामान्य घरगुती मीटर धारकांना तातडीने सवलत देवून आपली वचन पूर्ती करावी ऐसे जगजीत सिंग यांनी सांगितले.
आपणास माहितच आहे की दिल्ली मध्ये श्री अरविंद केजरीवाल सरकार मागच्या सात वर्षांपासून २०० युनिट वीज मोफत आणि जास्ती वापर करणाऱ्यांनाही कमीत कमी दरात वीजपुरवठा करीत आहे, त्यामुळे आम आदमी पार्टी हा मुद्दा घेवून राज्यात गेल्या एक दीड वर्षापासून सातत्याने आंदोलन करत आहे. आमच्या प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे आहेत.
1. दिवाळी असल्यामुळे राज्यातील नागरिकांची वीज कनेक्शन कपात बंद करावी.
2. ३०% स्वस्त वीज देण्याच्या जनतेला दिलेल्या वचननाम्याची पूर्तता करण्यात यावी.
3. कोविड दरम्यानचे मार्च ते ऑगस्ट या महिन्याचे २०० युनिट वीजबिल माफी करावी.
4. मार्च २०२० ते जून २०२१ या काळातील थकीतवर कोणतेही व्याज आकारू नये.
5. वीज कंपन्यांचे CAG ऑडीट करण्यात यावे.
6. दि. १ एप्रिल २०२० पासून केलेली वीज दर वाढ मागे घ्यावी.
राज्यातील जनतेच्या सहनशक्तीचा अंत न पाहता वरील मागण्या तातडीने निकाली काढाव्यात. जनतेला कोणतीही आर्थिक मदत जर आपण करू शकत नाही तर दिवाळी पूर्वी गोरगरीब जनतेची वीज जोडणी कपात करून त्यांच्या घरात अंधार करू नये, हीच विनंती मा मंत्री मोहोदय यांना करण्यात आली.
ह्या आंदोलनात अजय धर्मे, रोशन डोंगरे, आकाश कावळे, नामदेव कामडी, लष्मीकांत दांडेकर, सुरेंद्र समुद्रे, पीयुष आकरे, गिरीश तीतरमारे, विनोद अलंडोहकर, रविन्द्र कुथे, बाबा मेंढे, गौतम कावरे, पुष्पा डाबरे, संजय जिजकार, प्रमोद नाइक, बिल्लू बेहरा, प्रदिप पौनिकर, गुणवत सोमकुंवर, विजय नंदनवार, पंकज मिश्रा, विल्सन लियोनार्ड, नरेश महाजन, विशाल वेद्य, योगेश पराते, नरेश देशमुख, जगदीश रोकडे, सौरभ दुबै, सुनित चौरे, क्लेमेंट डेविड, राजकुमार बोरकर, पंकज मेश्राम, सतीश सोमकुंवर, अमित दुर्रानी, शुभम गुमसे, अनिल डोंगरे, दीपक बग्गा
सचिन चारोते, मिकी चारोते, विनोद खुबनानी, युवराज ठाकुर, आर्यन डोंगरे, पियूष दाहट, सारंग शेंडे, रौनक गेडाम, धीरज पाटिल, अखिल बोधकर, सुहेल गनवीर
प्रणय गनवीर, हरुष अम्बादे, राकेश खोब्रागडे, नंदेशस्वर राउत, राहुल डोंगरे, विपुल भोयर, राजकुमार कुंभारे, गुड्ड सोनकुसरे, मनोज नंदेशस्वर, पांडुरंग रोकड़े, प्रवीण ताकड़ीकर, मुन्ना, जोशना नंदेशस्वर, सतीश सोमकुवर,
सुजीत वाहने, पिंटू भाऊ नंदेश्वर्, अंकित राउत, रंजीत भाऊ, नंदेश्वर्, ऐलिस डेविड, कैंडी स्कोट, रेजिना जोसेफ
प्रियंका ताई नानेट, संगीता देशमुख, यश देशमुख ,माया बिसेन, गीता पॉल, क्रिस्टीना फ्रांसिस, यश साल्व, ज़ेवियर फ्रांसिस, रोहित देशभरतार, शुभम कोटनगले
जॉर्ज जॉन, मयंक क्रिस्टोफर, पीयूष हिरवाने,अमित मोने
प्रणय चव्हाण, विन सयानी, वैभव कार्नेलियस,स्नेहा गजभिए, अनिता राव, मोरेस्वर मौन्देकर, संजू निखारे
दर्शन खापेकर, मनोज दफरे, आंबरीशजी सावरकर, विशाल चौधरी, एम. झेड. काझी, गीता कुहिकर, संजय सिंग,हरीश गुरबानी, अल्का पोपटकर, विवेक चापले, राहुल कावळे,  अभिजित झा, संजू, दीपक बघेल, प्रकाश तिवारी, राकेश तिवारी, कपिल शुक्ला, अक्षय काटोले, सुरेश चौधरी, नंदू पाल, उत्तम शरणागते, विश्वजित मसराम, रंजनकुमार भगत, पंकज मेश्राम, अमित दुरानी दीपक बग्घा, सचिन चरोटे, मिकी चरोटे, विनोद खुदनानी, युवराज ठाकुर, बदल सोनटके, दिवाकर नितनवरे, दिलीप चौखंडरे, केवल ढाबर्डे, मुकेश भलावी, अमोल नितनवरे, विशाल दुपारे, संगीता भोसले निर्मला येनगांकुरे, हरिष वेळेकर, दीपमाळा बरपात्रे
संजय बारपात्रे, श्रीकांत लोहादे, मुकेश ओनिया, राहुल वाजे, स्नेहा गजभिये, प्रिया, दीपक भातखोरे, देवेंद्र समर्थ
मुन्ना शर्मा, योगेश पराते, दर्शन खापेकर, गुड्डू बावणे संजू निखारे किशोर चिमुरकर, विनोद गोर, मनोज चांदेकर इतर कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्तित होते.