विदर्भ वतन न्यूज पोर्टल नागपूर
दिवाळीचे दिन
पहिला दिवस । रे वसुबारस ।
गाई,वासरास । ओवाळती ।।
धनत्रयोदशी ।दुसऱ्या दिवशी ।
धनधान्य राशी । पूजती सारे ।।
यमदीपदान । प्रथा आहे छान ।
अपमृत्यू गाण । यमा पुढे ।।
लक्ष्मीचा तो वास । सत सहवास।
पूजन ते खास ।चौथ्या दिनी ।।
देवी धन्वंतरी ।आरोग्य शरीरी ।
धन यावे घरी । अखंडित ।।
दिवाळी पाडवा । कुटुंबी गोडवा ।
असत्य तुडवा ।सत्यतेने ।।
पाच फळा मान ।झेंडूचे तोरण।
लक्ष्मीचे पूजन । देव्हाऱ्यात ।
भाऊ नी बहीण ।अतूट बंधन।
भाऊबीज दिन। जिव्हाळ्याचा ।।
एक एक दिन ।दिवाळीचा छान ।
अभंगाचे पान ।मांडी युवा ।।
श्री.युवराज गोवर्धन जगताप
काटेगाव ता :- बार्शी
जिल्हा:- सोलापूर
8275171227

