
विदर्भ वतन न्यूज पोर्टल नागपूर
नागपूर – नागपूर शहरात ‘सायबर’ गुन्हांच्या संख्येत वाढ दिसू लागली आहे़ आँनलाईनच्या युगात बरेच सुशिक्षित लोक बराच वेळ सोशल मिडिया वर घालवतात़ अनेक जणी एकटेपणाच्या नादात अनोळखी व्यक्तींशी संवाद साधताना दिसून येतात़ सोशल मिडीया या माध्यमांवरील ‘आँनलाईन चँट’ वर अनोळखी व्यक्तींशी संवाद करणे टाळले पाहिजेत, असे मत सायबरतज्ज्ञ अजित पारसे यांनी व्यक्त केले आहे़ काही वर्षातच नागपूर शहरात सायबर गुन्हांचा आकडेवारी वाढली दिसून येत आहे़ २०१९ च्या तुलनेत २०२० साली नागपुरात सायबर गुन्ह्यांची संख्या १०४ टक्क्यांनी वाढली़ सायबर गुन्हेदरात नागपूरचा क्रमांक देशात आठवा होता़ २०२० साली नागपुरात सायबर गुन्ह्यांचे २४३ गुन्हे दाखल झाले़ २०१९ मध्ये हाच आकडा ११९ इतका होता़ २०२० मधील तब्बल १४१ गुन्हे फसवणुकीचे होते़ अनेक सायबर गुन्हे प्रत्यक्षात पोलिसापर्यंत पोहोचतच नाहीत़ संबंधित प्रकरणांत तक्रार झाल्यास बदनामी होईल या भितीपोटी अनेक लोक तक्रार करायला पुढे येत नाही़ एकटेपणाची भावना निर्माण करुन लोक मानसिक आधारासाठी ‘चँटरुम्स’ कडे वळतात़ ‘टाँक टू अ स्ट्रेन्जर’ च्या मोहात अडकून नागपुरातील अनेक नेटक-यांनी स्वत:चे नुकसान करुन घेतले असल्याचे अजित पारसे यांच्या सायबर गुन्हेगारीचे विश्र्लेषणातून समोर आले आहे़
सोशल मीडिया चा वापर करताना कुणाशीही फें्रडशिप करणे, अनोळखी व्यक्तींशी संवाद साधणे आणि आपली वैयक्तिक माहिती शेअर करण्याचा मोह अनेकांना आवरत नाही़ काही ‘चँटरुम्स’ तर ओळख जाहिर करत नसल्याचा दावा करतात़ नको त्या मनोरंजनाच्या हव्यासापोटी काहींचा तोल सुटतो़ मनमोकळया संवादाचे गुन्हेगार रेकाँर्ड तयार करतात व त्याच्या आधारे ‘युझर्स’ ची छळवणूक सुरु होते़ त्यामुळे प्रत्येकाने सावधगिरी बाळगायला हवी़ कुटुंबातील प्रत्येकाला व्यक्तिगत माहिती शेअर करण्याचे धोके समजावून सांगावे, असे आवाहन पारसे यांनी केले़

