आशा वर्कर यांची रखडलेली प्रोत्साहन राशी तात्काळ द्या आम आदमी पार्टी चा आशा वर्कर यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा

226
विदर्भ वतन न्यूज पोर्टल नागपूर 
चंद्रपूर – करोना काळात स्वतः च्या जीवाची तथा आपल्या परिवाराची काळजी न करता दिवस रात्र जनतेत जाऊन सेवा देणाऱ्या आशा वर्कर यांना त्याचा कोविळ काळातील प्रोत्साहन राशी ४०००/- देण्याचे पालकमंत्री यांनी आश्वासन दीले होते. मात्र आपल्या आश्वासनावर ठाम न राहता प्रशासनाकडून आश्वासनांचे गाजर दीले जात आहे. मात्र आता शहरातील सर्व आशा वर्कर यांनी सीटीयू चे राज्य सचिव काॅ. विनोद झोडगे यांच्या नेतृत्वाखाली  आर पार च्या लढाईकरीता आपली कमर कसली असून मागील दोन दिवसांपासून आपल्या लहान मुलांना सोबत घेऊन मनपा समोर ठीय्या आंदोलन सुरू केले आहे.
दिनांक २6/10/21 पासुन  आपल्या मागण्या घेऊन दोन दिवसांपासून महानगर पालिका समोर आंदोलन करीत असलेल्या आशा वर्कर यांच्या आंदोलनाला  आम आदमी पार्टी चंद्रपूर  तर्फे जाहीर पाठिंबा/समर्थन देण्यात आला. तसेच प्रशासनाने तात्काळ दोन दिवसात मागण्या पूर्ण न केल्यास आम आदमी पार्टी पूर्ण ताकदीने रस्त्यावर उतरेल अशी ग्वाही आप जिल्हा अध्यक्ष सुनील मुसळे यांनी दिली..
या वेळेस आप चे जिल्हा अध्यक्ष सुनील भाऊ मुसळे, शहर सचिव राजु शंकरराव कुडे, युवा जिल्हा अध्यक्ष मयूर भाऊ राईकवार, जिल्हा कोषाध्यक्ष भिवराज सोनी, जिल्हा सचिव संतोष दोरखंडे, बल्लारपुर शहर अध्यक्ष रवि भाऊ पुप्पलवार, असिफ भाई शेख, निखील बारसागडे, सोशल मीडिया प्रमुख राजेश चेडगुलवार,  दीपक निपाने, प्रवीण उंदिरवाडे, प्रवीण चुनारकर, श्रीमती सुजाता ताई बोदेले, ऐश्वर्या वासनिक, अंजू ताई रामटेके, पिंकी ताई कु कुकुडकर, चंदु माडुरवार, अश्रफ सय्यद, कालिदास ओरके, अंकूश राजूरकर, सुखदेव दारूनडे, जयंत थूल, जयदेव देवगडे, बाबाराव खडसे, हितेश धाकडे, इत्यादी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.