राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मामेभाऊवर ईडीकडून छापेमारी…

166
विदर्भ वतन न्यूज पोर्टल नागपूर

महाराष्ट्र – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीयांच्या घरी ईडीने पुन्हा छापेमारी केली आहे. अजित पवार यांचे मामेभाऊ जगदीश कदम यांच्या घरी ईडीकडून तपासणी सुरू आहे. कदम यांच्या पुण्यातील घरी ईडीच्या पथकाकडून छापा टाकण्यात आला आहे. जगदीश सध्या दौंड शुगर या कारखान्याचे संचालक आहेत. दौंड शुगर्स, जरंडेश्वर साखर कारखाना यांदर्भात ही कारवाई करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे.

यासंदर्भात इडीकडून तपास करण्यात येत आहे. ईडीने दौंड शुगर संबधित लोकांची याआधी ईडीने चौकशी केली होती. त्यानंतर आता जगदीश कदम यांची चौकशी करण्यात येत आहे. अजित पवार यांच्याशी संबंधित कारखाने व कंपन्यांवरील कारवाईमुळे सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. याआधीही काटेवाडीमध्ये ईडीने छापेमारी केली होती. त्यानंतर काही दिवसांपूर्वी अजित पवारांच्या निकटवर्तीयांच्या घरी आयकर विभागाने धाड टाकली होती.