विद्यार्थ्यांसाठी अद्ययावत पुस्तकालय उभारा-उमरेड कोचिंग असोसिएशनची मागणी

128
विदर्भ वतन न्यूज पोर्टल नागपूर

नागपूर – उमरेड शहर हे शैक्षणिक क्षेत्रात प्रगत होत आहे,आजुबाजूच्या परिसरातून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी शिक्षणाचा पाया मजबूत करण्यासाठी उमरेड शहराकडे धाव घेत आहेत,उमरेड ग्रामीण चे विद्यार्थी शैक्षणिक प्रगतीकडे वाटचाल करीत आहेत,अश्या परिस्थितीत या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य मिळणे तेवढेच आवश्यक आहे,यासाठी आमदार राजू पारवे यांनी पुढाकार घेऊन एक भव्य पुस्तकालय उमरेड शहरात उभारावे या मागणीसाठी उमरेड कोचिंग असोसिएशन ने आ राजू पारवे यांची भेट घेतली,नुकतीच आ पारवे यांची जिल्हा नियोजन समितीवर निवड झाली,त्यांना वाढीव विकास निधी मिळणार आहे,विद्यार्थ्यां साठी एक मोठे पुस्तकालय शहरात निर्माण झाल्यास खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांना याचा उपयोग होईल,कित्येक विद्यार्थ्यांना पैसे नसल्याने महागडी पुस्तके घेणे परवडणारे नसते,या पुस्तकाअभावी कित्येक विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत पाहिजे तसे यश मिळत नाही,स्पर्धा परीक्षे शिवाय सरकारी नोकरी नाही,त्यामुळे या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना या पुस्तकालयाचे नक्की फायदा होईल,वैद्यकीय शिक्षण असो वा अभियांत्रिकी वा कोणतेही शिक्षण सध्या स्पर्धा परीक्षेशिवाय पर्याय नाही,यामुळे पुस्तकालाय ही काळाची गरज असल्याचे मत कोचिंग संचालकांनी व्यक्त केले,आमच्या परीने आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना आम्ही आमच्या क्लासेस मध्ये मोफत शिक्षण देतोच शिवाय कोरोना काळात पालकत्व गमावलेल्या पाल्याना मोफत शिक्षण आमच्या संस्थेकडून मिळते,सोबत जर शासकीय पुस्तकालय झाले तर एक शिक्षणाचा सुवर्णमध्ये साधता येईल असेही मत त्यांनी व्यक्त केले,स्पर्धा परीक्षेत आपल्याकडील विद्यार्थ्यांना पाहिजे त्या प्रमाणात बाकीच्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत यश कमी मिळते,आपल्या विद्यार्थ्यांना यात जर यशस्वी व्हायचे असेल तर वेगळे प्रयत्न होणे आवश्यक आहे,जागरूकता निर्माण करून तरुणांची डोके पुस्तकात खपविणे आवश्यक झाले आहे,याप्रसंगी उमरेड कोचिंग असोसिएशनचे मनीष घुगुसस्कर,अतुल चौधरी, प्रदीप झोडे,भूषण अड्यालवाले,सुबोध धनविजय,अविनाश डंभारे,विनोद पिल्लेवान उपस्थित होते.