राज्यातील बहुतांश शाळांत शिक्षकांच्या जागा रिकाम्या, कधी होणार स्वप्न पूर्ण ?

134
विदर्भ वतन न्यूज पोर्टल नागपूर

गोंदिया – शिक्षकांची हजारो पदे राज्याच्या शिक्षण विभागात रिक्त आहेत़ त्यातच नवीन गोंधळ सुरु आहे़ त्यामुळे याचा परिणाम भावी शिक्षकांवर होत आहे़ केवळ पारदर्शकतेच्या नावाखाली एकाच भरती प्रक्रियेला चार चार वर्षे लागत असल्याने डी़एड़,बी़एड़ बेरोजगारांमध्ये तीव्र नाराजी आहे़ पवित्र पोर्टलची प्रक्रिया फारच मंद गतीने सुरु असल्याने शिक्षक होण्याचे अनेकांचे स्वप्न केवळ स्वप्नच राहण्याची शक्यता आहे़ राज्यात शिक्षक भरती करण्यासाठी डिसेंबर २०१७ मध्ये परीक्षा घेण्यात आली़ चार वर्षे लोटत आली तरी पवित्र पोर्टलची प्रक्रिया अजूनही पूर्ण झाली नाही़ तत्कालीन शिक्षणमंत्री विनोद तावाडे यांच्यापासून सुरु झालेली ही प्रक्रिया माजी मंत्री आशिष शेलार आणि आत विद्यमान शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्यापर्यंत पोहोचली आहे़ राज्यात सेना-भाजपाचे सरकार बदलून महाविकास आघाडीचे सरकार आले़ तरी शिक्षक भरतीचा हा पवित्र खेळ सुरुच आहे़ या-ना त्या कारणाने भरती पुढे ढकलत गेली़
तत्कालीन सरकारने शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टल कार्यान्वित केले़ शिक्षक भरतीत भ्रष्टाचार होउ नये़ गुणवत्तापुर्ण शिक्षक शाळांना मिळावेत, यासाठी पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरती करण्याचा निर्णय तत्कालीन शिक्षणमंत्री विनोद तावाडे यांनी २०१७ साली घेतला़ पोर्टलवर १ लाख २३ हजार उमेदवारांची नोंदी केली आहे़.
भावी शिक्षकांच्या आयुष्यांची ४ वर्षे भरतीची वाट पाहण्यात वाया गेली़ नुकत्याच झालेल्या शिक्षक दिनाच्या तोंडावर भरतीची प्रक्रिया सुरु करण्यात आल्याची घोषणा केली़ मात्र, अद्याप ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली नाही़ राज्यातील बहुतांश शाळांत शिक्षकांच्या जागा रिकाम्या आहेत़ जिल्हा परिषद शाळांमध्शे तब्बल ५०० पदे रिक्त आहेत़ यामध्ये मराठी आणि हिंदी माध्यमांच्या शिक्षक पदांचा समावेश आहे.