Home नागपूर चला ‘हलाल’ मुक्त दिवाळी साजरी करूया ! (लेख)

चला ‘हलाल’ मुक्त दिवाळी साजरी करूया ! (लेख)

173 views
0
विदर्भ वतन न्यूज पोर्टल नागपूर
  • चला ‘हलाल’ मुक्त दिवाळी साजरी करूया !
  • धर्मनिरपेक्ष भारतात धर्मावर आधारित चालणारी ‘हलाल प्रमाणपत्र’ व्यवस्था तात्काळ बंद करायला हवी

लेख/ सध्या भारतीय मुसलमानांकडून प्रत्येक पदार्थ, वस्तू इस्लामनुसार वैध अर्थात् ‘हलाल’ असण्याची मागणी केली जाऊ लागली आहे. ही मागणी केवळ मांसापुरती मर्यादित राहिली नसून धान्य, फळे, सौंदर्यप्रसाधने, औषधे आदी उत्पादनेही हलाल नामांकित असावीत, अशी मागणी मुसलमान करत आहेत. त्यासाठी व्यापार्‍यांना आवश्यकता नसतांनाही प्रत्येक उत्पादनासाठी दरवर्षी 21 सहस्र 500 रुपये भरून ‘हलाल’ प्रमाणपत्र घ्यावे लागत आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे हे प्रमाणपत्र अन्न आणि औषध प्रशासनाकडून (FDA) नव्हे, तर ‘जमियत-उलेमा-ए-हिंद’ यांसह 7-8 कट्टरतावादी आणि खाजगी मुसलमान संघटनेकडून दिले जाते. या हलाल अर्थव्यवस्थेने भारतच नव्हे, तर विश्‍वभरात दबदबा निर्माण केला आहे. हिंदूंचा व्यापार आणि व्यवसाय यांमध्ये हस्तक्षेप करून समांतर आर्थिक व्यवस्था उभी करण्याचे हे जागतिक षड्यंत्र आहे. या अर्थव्यवस्थेमुळे अल्पसंख्य मुसलमानांची बहुसंख्यांकांवर एक प्रकारची हुकूमशाहीच चालू आहे.
भारत सरकारने शरीयत आधारित ‘इस्लामिक बँक’ भारतात चालू करण्याची मागणी फेटाळून लावली. यामुळे थेट धर्माच्या आधारावर निधी गोळा करण्याची नवी शक्कल मुसलमानांनी लढवली होती. कोणताही ग्राहक संविधानाने दिलेल्या धार्मिक स्वातंत्र्याचा लाभ घेऊन त्याच्या धर्मानुसार संमत साहित्य आणि पदार्थ यांचा आग्रह धरू शकतो. याचा आधार घेत मुसलमानांकडून प्रत्येक पदार्थ, वस्तू इस्लामनुसार वैध अर्थात ‘हलाल’ असण्याची मागणी केली जाऊ लागली आहे. देशात केवळ 15 टक्के असणार्‍या अल्पसंख्य मुसलमान समाजाला इस्लामनुसार संमत ‘हलाल मांस’ खायचे आहे, म्हणून उर्वरित 85 टक्के जनतेवरही ते लादण्यात येऊ लागले. आता तर हे ‘हलाल प्रमाणपत्र’ केवळ मांसापुरते मर्यादित न राहता, खाद्यपदार्थ, सौंदर्यप्रसाधने, औषधे, रुग्णालये, गृहसंस्था, मॉल यांसाठीही चालू झाले. सुप्रसिद्ध ‘हल्दीरामची उत्पादने, आशीर्वाद आटा, अमूलचे आईसक्रीम, फॉर्च्युन ऑईल यांसह अनेक आयुर्वेदीक औषधे ही हलाल प्रमाणित झालेली आहे. यामुळे हलाल प्रमाणपत्राच्या आधारे मांसासह या अन्य पदार्थांचा व्यवसायही हिंदु उद्योजकांकडून बळकावला जात आहे.
ही मागणी आता केवळ खासगी आस्थापनांपुरती मर्यादित न रहाता यात निधर्मी भारत सरकारची रेल्वे सेवा आणि ‘एअर इंडिया’ यांतही ‘हलाल’ अनिवार्य करण्यात आले आहे. ‘भारत देश हा धर्मनिरपेक्ष आहे’, असे सांगितले जाते. असे असतांना केवळ ‘इस्लाम’ला मान्य असलेली उत्पादने रेल्वे आणि एअर इंडिया यांमध्ये कशी काय विकली जाऊ शकतात ? अशा प्रकारे एखाद्या हिंदू उद्योजकाने एखादे उत्पादन चालू करून त्यांनीच प्रमाणित केलेल्या वस्तू घ्याव्यात, असा निर्णय बंधनकारक केल्यास शासनाच्या रेल्वे आणि एअर इंडिया यांच्यासारख्या सरकारी आस्थापनांना ते मान्य होईल का ?
भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत ‘अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण’ तसेच प्रत्येक राज्यात स्वतंत्र अशी ‘अन्न आणि औषध प्रशासन’ या विभागाची स्थापना करण्यात आली आहे. एकीकडे खाद्यपदार्थांशी संबंधित प्रमाणपत्र देणारी ‘सेक्युलर’ शासनाची व्यवस्था असतांना ‘हलाल प्रमाणपत्र’ देण्याची अनुमती खासगी इस्लामिक धार्मिक संस्थांना का देण्यात आली आहे ? याचसमवेत सरकार जेव्हा अशा पदार्थांना प्रमाणपत्र देते, तेव्हा त्याची चाचणी घेतली जाते. ‘हलाल’चे प्रमाणपत्र देतांना मात्र शासनाचे कोणतेही बंधन न पाळता खासगी संस्था केवळ धार्मिक आधारावर देत असलेल्या हलाल प्रमाणपत्राच्या नावे केली जाणारी शुल्क आकारणी वैध का ठरवली जाते ? या खाद्यपदार्थांमधून कोणाला गंभीर आरोग्य समस्या उद्भवल्यास त्याचे दायित्व कोण घेणार ?
हलाल उत्पादनांतून लाभ मिळवायचा आणि तो नफा इस्लामिक बँकेद्वारे उत्पादनांच्या वृद्धीसाठी वापरायचा, तसेच इस्लामिक बँकेतून हलाल उत्पादने बनवणार्‍यांना आर्थिक साहाय्य उपलब्ध करून द्यायचे आणि जागतिक स्तरावरील बाजारावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करायचा. असे केल्यामुळे संपूर्ण साखळीवर त्यांचे नियंत्रण राहिल्याने इस्लामिक बँकेच्या स्थितीत लक्षणीय पालट झाला. बँकेच्या संपत्तीत वर्ष 2000 मध्ये असलेल्या 6.9 टक्क्यांवरून वर्ष 2011 मध्ये 22 टक्के इतकी वृद्धी झाली. ‘हलाल इंडस्ट्री’ जगभरात सर्वाधिक वेगाने वाढणारी व्यवस्था बनली आहे. अर्थात इस्लामच्या आधारे ‘हलाल इंडस्ट्री’ आणि ‘हलाल अर्थव्यवस्थे’च्या आधारे ‘इस्लामिक बँक’ मोठी बनत चालली आहे.
‘हलाल सर्टिफिकेशन’ (प्रमाणिकरण) द्वारे जगाची अर्थव्यवस्था नियंत्रणात आणली जात आहे. गेल्या 50 वर्षांत 10 ट्रिलियन अमेरिकी डॉलरची अर्थव्यवस्था इस्लामी देशांनी उभी केली आहे. हलालचा पैसा इस्लामी वर्चस्व निर्माण करणे आणि आतंकवाद यांसाठी वापरला जात आहे, अशी जगभरातील अनेक गुप्तचर संस्थांची माहिती आहे. भारतातही अनेक आतंकवादी कारवायांमध्ये पकडले गेलेल्या आरोपींना सोडवण्यासाठी हलालचा पैसा संबंधित संस्था वापरत आहेत. हलाल हे ‘मदर ऑफ जिहाद’ आहे. अनेक देशांत पंचतारांकित हॉटेलांमध्ये आतंरराष्ट्रीय परिषदा भरवून त्या देशातील राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांना बोलावून ‘तुम्ही हलाल सर्टिफिकेट घेतल्यास एक चतुर्थांश जग तुमची उत्पादने घेईल’, असे प्रलोभन दाखवून त्यांना ‘हलाल सर्टिफिकेट’ घेण्यास बाध्य केले जात आहे.
* तरी या संदर्भात आम्ही पुढील मागण्या करत आहोत !
1. कोणतेही उत्पादन बाजारात विक्री करण्यासाठी भारत सरकारने जी नियमावली सिद्ध केली आहे, ती सोडून केवळ धर्माच्या आधारावर कोणालाही स्वतंत्र प्रमाणपत्र देऊन ती वस्तू बाजारात विकण्याची अनुमती देण्यात येऊ नये.
2. ज्या ज्या खासगी आस्थापनांना ‘हलाल’ प्रमाणपत्र देण्याची अनुमती देण्यात आली आहे, त्या सर्व आस्थापनांची अशी अनुमती त्वरित रहित करण्यात यावी. शासनाच्या रेल्वे, एअर इंडिया यांच्यासारख्या ज्या ज्या सरकारी आस्थापनांमध्ये असे प्रमाणपत्र दिलेल्या वस्तू विकल्या जातात, त्याची अनुमती त्वरित रहित करण्यात यावी.
3. आजपर्यंत ज्या इस्लामिक संस्थांनी ‘हलाल’पत्र दिले, त्या सर्व संस्थांची सीबीआयद्वारे चौकशी करून या निधीचा वापर आतंकवाद्यांना साहाय्य करण्यासाठी झाला का ? यामागे कोणते आंतरराष्ट्रीय षड्यंंत्र नाही ना ?, याची सखोल चौकशी करण्यात यावी. त्यात काही तथ्य आढळल्यास संबंधित संस्था आणि त्यांचे पदाधिकारी यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
4. भारतात मोठ्या प्रमाणात ‘ऑनलाईन’ व्यापारातून करोडोंचा व्यापार होतो. यामध्ये दिवाळीसारख्या सणांत हिंदु ग्राहक मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. याकडे ‘हलाल’ प्रमाणित आणि हिंदूंच्या परंपरांचे इस्लामीकरण करणार्‍या आस्थापनांचे लक्ष आहे. त्यामुळे हिंदु जनजागृती समिती ‘हलाल मुक्त दिवाळी’ ही मोहिम राबवत असून या मोहिमेत संपूर्ण हिंदु समाजाने सहभागी व्हावे !

– श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती, (संपर्क क्र.: 99879 66666)