टी-२० भारत vs पाक सामन्यात, पाकिस्तान संघाचा दणदणित विजय

203

विदर्भ वतन न्यूज पोर्टल नागपूर

आंतरराष्ट्रीय / भारत-पाकिस्तान महामुकाबल्यात टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात पहिल्यांदाच पाकिस्तानच्या संघाने भारताचा वाईट पद्धतीने पराभव केला आहे. 152 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानच्या सलामीवीरांनी दणदणीत फलंदाजी करताना सामना एकतर्फी केला. बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान या दोघांनीही टीम इंडियाच्या गोलंदाजांना संधी दिली नाही. सुरुवातीपासूनच या दोन्ही फलंदाजांनी टीम इंडियाच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले.

बाबर आझमने 52 चेंडूत नाबाद 68 आणि मोहम्मद रिझवानने 55 चेंडूत नाबाद 79 धावा केल्या. पाक संघाने 13 चेंडू आधीच सामना जिंकून आपल्या नावावर केले.

कोहलीचे अर्धशतक
टी -20 विश्वचषकात भारतीय कर्णधार विराट कोहलीचा हा सलग तिसरा 50+ स्कोअर होता. यापूर्वी, त्याने 2016 च्या विश्वचषकात ऑस्ट्रेलियाविरुद्ध 51 चेंडूत नाबाद 82 आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात 47 चेंडूत नाबाद 89 धावा केल्या होत्या.