आमदार राजू पारवे यांच्या अध्यक्षतेखाली कुही नगर पंचायत अंतर्गत सर्व विभागाची आढावा बैठक

168
विदर्भ वतन न्यूज पोर्टल नागपूर
नागपूर – आमदार राजू पारवे यांच्या अध्यक्षतेखाली कुही नगर पंचायत अंतर्गत सर्व विभागाची आढावा बैठक घेतली.दि. २३/१०/२०२१ रोज शनीवार ला उमरेड विधानसभा क्षेत्राचे आमदार राजू पारवे यांच्या अध्यक्षतेखाली लक्ष्मी मंगल कार्यालय कुही येथे सर्व संबंधीत विभागाचा अधिकाऱ्यांन सोबत आढावा बैठक घेण्यात आली.
तसेच कुही शहरातील सर्व समस्या लक्षात घेऊन त्याच्यावर तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले.
या मध्ये विदयुत पुरवठा, घरकुल, पाणी पुरवठा, आरोग्य, इको पार्क गार्डन करिता जागा उपलब्ध करण्यात आली, मुस्लीम समाजासाठी कब्रस्थान करिता जागा उपलब्ध करण्यात आली, शहरातील संपूर्ण इलेक्ट्रीकॅल वायरिंग भूमिगत करण्याचे प्रस्ताव तयार कारण्यास सांगितले, मेन रोडवरील स्ट्रीट लाईट खांबाना LED लाईट लावण्यास सांगितले, शहरातील मुख्य ठिकाणी CCTV Camere लावण्याचे प्रस्ताव तयार करण्यास सांगितले, कुही शहरातील ३०% ते ४०% एरिया Town Planning करिता प्रस्तावीत करण्यात आले.
या वेळी तहसिलदार तिनघसे, मुख्याधिकारी मांडगे, ठाणेदार मदने, माजी नगराध्यक्ष सुरेश येळणे, विलास राघोर्ते, राजू येळणे, सुधाकर इटनकर, चंदा येळणे, अमित ठवकर, शारदा दुधपचारे, देविदास ठवकर, सचिन घुमरे, कैलास चौधरी, स.गा.यो.अध्यक्ष सुनील किंदर्ले, बा.स. उपसभापती महादेव जीभकाटे, संदीप खानोरकर, हरीश कडव, अरुण धांडे, रामकृष्ण डहाके, आनंद खडसे, हबीब शेख, दीपक केने, शरीन शंभरकर, गणेश दुधपचारे, आकाश लेंडे, मयूर तळेकर, बापू घुमरे, प्रतिक धबाले, प्रशांत दशमवार, समिर पठाण व सर्व संबंधित विभागाचे अधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.