Home आध्यात्मिक नामस्मरण

नामस्मरण

0
नामस्मरण
विदर्भ वतन न्यूज पोर्टल नागपूर
      नामस्मरण
तोंडी ईश नाव। मनी ठेवा भाव ।
अंतरात गाव ।भक्ती रूपे ।।
ईश्वराचे नाम ।मनास व्यायाम।
देह चारीधाम ।मग होई ।।
नयनी साठवा। हृदयी गोठवा।
प्रतिमा आठवा ।ईश्वराची ।।
नको हार तुरे । मंदिरास फेरे ।
भाव हवे खरे ।मनामध्ये ।।
असावी रे श्रद्धा।नको अंधश्रद्धा।
तेंव्हा देव सुद्धा । कृपा करी ।।
करी जप तन । शांत राही मन ।
जपा हेचि धन । सुखासाठी ।।
मुखी नाम हरी।जो नित उच्चारी।
शुद्धता अंतरी ।होई वेगे ।।
श्री.युवराज गोवर्धन जगताप
     काटेगाव ता :- बार्शी
      जिल्हा:- सोलापूर
       8275171227