बाबुपेठ येथील आंबेडकर चौक येथे नॅशनल हायवे वर गती रोधक द्या | आम आदमी पार्टी बाबुपेठ ची जिल्हाधिकारी यांचे कडे मागणी

142
विदर्भ वतन न्युज पोर्टल नागपूर:-

चंद्रपूर – चंद्रपूर मधील बाबुपेठ प्रभागात मागील काही दिवसांपासून नॅशनल हायवे वरती अपघाताचे प्रमाण वाढले असून याकडे प्रशासनाचे अक्षरशः दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आम आदमी पार्टी चे शहर सचिव राजु भाऊ कुडे यांनी केला आहे. बाबुपेठ मधील नॅशनल हायवे ओलांडून रोज हजारो प्रवासी ये जा करीत असतात. या रोड वरती आधी सार्वजनिक बांधकाम विभागाने गतिरोधक (स्पीड ब्रेकर) दिले होते, परंतु मा. राज्यपाल यांच्या दौऱ्यादरम्यान येथील संपूर्ण गतिरोधक (स्पीड ब्रेकर) काढण्यात आले, ज्यामुळे अपघातामध्ये प्रचंड वाढ झाली आहे. अश्यातच आता शाळा कॉलेज सुरू झाल्याने शाळकरी मुले, विद्यार्थी यांचे अवागमन मोठ्या प्रमाणात होत आहे. अश्यातच मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.

याबाबत आज आम आदमी पार्टी तर्फे मा. जिल्हाधिकारी साहेब तसेच बांधकाम विभाग यांना निवेदन देण्यात आले.आणि तात्काळ सात दिवसाच्या आत तिथे स्पीड ब्रेकर लावण्यात यावे जेनेकरून अपघात टाळता येतील अन्यथा आम आदमी पार्टी तर्फे जनतेला सोबत घेऊन रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल अशी  मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
यावेळेस आप चे जिल्हा अध्यक्ष सुनील भाऊ मुसळे, शहर सचिव राजु भाऊ कुडे,जिल्हा कोषाध्यक्ष भिवराज सोनी  युवा जिल्हा अध्यक्ष मयूर भाऊ राईकवार, सोशल मीडिया प्रमुख राजेश चेडगुलवार, निखिल बारसागडे, दीपक निपाने, राहील भाई बेग, प्रवीण उंदिरवाडे, प्रवीण चुनारकर, श्रीमती सुजाता ताई बोदेले, ऐश्वर्या वासनिक, अंजू ताई रामटेके, पिंकी ताई कुकडकर, चंदु माडुरवार, अश्रफ सय्यद, कालिदास ओरके, अंकूश राजूरकर, सुखदेव दारूनडे, जयंत थूल, जयदेव देवगडे, बाबाराव खडसे, हितेश धाकडे, इत्यादी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते..