नागपूरच्या कर्तव्य स्केटिंग अकादमी ने 32 मेडल पटकाविले

88
विदर्भ वतन न्यूज पोर्टल नागपूर:-

नागपूर – ओपन इंव्हिटॅशनल रोलर स्केटिंग स्पर्धा 2021 नुकतीच NMC स्केटिंग रिंक नंदनवन येथे पार पडली. या स्पर्धामध्ये नंदनवन येथील कर्तव्य अकादमीच्या स्केटरनी नेत्र दीपक कामगिरी करत 12 सुवर्ण, 12 सिल्वर, 8 ब्राँझ असे मिळून एकूण 32 मेडल प्राप्त करून स्केटिंग अकादमीचे नाव लौकिक केले आहे. या स्पर्धेत कर्तव्य स्केटिंग अकादमीच्या प्रसन्ना भगत, शिरीशा कोंडलकर, रुद्र घाटोळे, सांज घाटोळे, अंशुमन निभोरकर, लारीशा काशिकर, अस्मिता बोलधने, दीप बागडे, स्पर्श गायकी, आयुशी धावडे, तनीषा मुंडले, यांनी सुवर्ण तर ओव्या खोडे, पवित्रा चेत्तीयर, लावण्या मानकवडे, तमन्ना मेहता, यावी ठवकर, रिद्देश पाटील, हितेश शिवहरे, आराध्य वाडीभस्मे, विक्रांत बांते, सोहम दवंडे, तन्मय देशमुख, पूर्वेश गजभिये यांनी सिव्हर आणि शोल्क खोडे, तान्ह्या ठवकर, आराध्य डफ, जणू कुनपारा, संचिता ठोमरे, अंश गुप्ता, प्रणवी भगत, मानस देशमुख, यांनी बाँझ मेडल पटकाविले आहे. सर्व खेळाडू कर्तव्य स्केटिंग अकादमी कोच विष्णू वाघे आणि शशीकांत ठाकरे यांच्या मार्गदशनखाली नियमित सराव करतात. या कामगिरी बद्दल कर्तव्य अकादमी मार्गदशक माजी उपमहापौर शेखर सावरबांधे व सचिव दीपक आदमाने यांनी अभिनंदन केले आहे.