खरे ईश्वर

100
विदर्भ वतन न्यूज पोर्टल नागपूर :-

   खरे ईश्वर

माता पिता हेच देव
माझ्या घराच्या मंदिरी
नको वारी,उपवास
घर हीच रे पंढरी
पिता आहे पांडुरंग
काळ्या मातीत राबतो
त्याच्या घामाचा सुवास
गृह गाभारी वाहतो
आई रुक्मिणी सोबती
सात जन्माची ही साथ
तिच्या प्रेम ओलाव्याचा
कृपा आशिर्वाद हात
करी माता,पिता सेवा
देव रूप त्यांच्या ठाई
नको काशी रामेश्वर
आहे सेवेत पुण्याई
माथा ठेवून रे पायी
घेतो आशिष थोरांचे
मन प्रसन्न होवूनी
सुटे गुंथे विचारांचे
नच शोधले ईश्वरा
घर अंगणा बाहेर
माता पित्यास मानतो
खरे सजीव ईश्वर
श्री.युवराज गोवर्धन जगताप
     काटेगाव ता :- बार्शी
     जिल्हा :- सोलापूर
      8275171227