सोमलवाडा जमीन केस प्रकरणी आरोपी अखेर सेंट्रल जेल रवाना…

76
विदर्भ वतन न्यूज पोर्टल नागपूर :-

नागपूर – आरोपी नामे सदन नारायण यादव वय 59 वर्षे अध्यक्ष रचना हाउसिंग सोसायटी यांच्याविरुद्ध बेलतरोडी पोलीस स्टेशन अंतर्गत नमूद गुन्ह्यात भा.द.वि. कलम 416, 406, 420, 468, 471, 120 , 199, 200, 34 यानुसार आरोपीला 13 ऑक्टोबर 21 ला जमीन हेरा – फेरी च्या प्रकरणात बेलतरोडी पोलीसांच्या द्वारे अटक करून न्यायालयासमोर 13 ऑक्टोबर रोजी हजर केले असता सन्माननीय न्यायालयाने दि. 16 ऑक्टोबर 2021 रोजी हजर केले असता सन्माननीय न्यायालयाने आज दि. 20 ऑक्टोबर 21 पर्यंत, पोलीस कोठडीची सुनावणी केली होती. व असेही आदेश दिले होते की, तपासाच्या दृष्टीकोनातून आरोपीची पोलीस कोठडी ही महत्त्वाची आहे. आज दि.20 ऑक्टोबर 2021 ला पुन्हा न्यायालयात आरोपी ला हजर केले असता तक्रारदार यांच्या वतीने वकिलांनी व बेलतरोडी पोलिसांनी न्यायालया समोर ही बाब मांडली की तपास सुरू असून आरोपीकडून महत्वपूर्ण कागदाची जप्त झाली आहे. असे निदर्शनात आणून दिले की आरोपी हा या प्रकरणात एकटा नसून आणखीही व्यक्तींचा समावेश आहे. व आणखी पोलिस कोठडीची मागणी केली. ही वरील सर्व बाब लक्षात घेता न्यायालयाने आरोपीला 20 ऑक्टो, 2021 पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात केली होती. आज 20 ऑक्टोबर रोजी, मा.न्यायालयाने आरोपींना न्यायालयीन कोठडी ची सुनावणी केली असून आरोपी सदन नारायण यादव यास मध्यवर्ती कारागृह येथे रवानगी करण्यात आली. याप्रकरणात आरोपी सदन यादव याने अटक पूर्व जामीन करिता सन्माननीय उच्च न्यायालयाकडे धाव घेतली. असता उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावले होते. न्यायालयात तक्रारदार राजेश माणिकराव काचोरे राहणार सोमलवाडा नागपूर यांच्या वतीने तक्रारदाराची बाजू अँड. घनश्याम गंगोत्री, अँड.राजेंद्र साहु, अँड. गुरुपितसिंह चांडोक यांनी बाजू मांडली.