Home गोंदिया चार दिवसानंतर कालव्यातील पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलेली चिमुकलीचा मृतदेह सापडला

चार दिवसानंतर कालव्यातील पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलेली चिमुकलीचा मृतदेह सापडला

0
चार दिवसानंतर कालव्यातील पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलेली चिमुकलीचा मृतदेह सापडला
विदर्भ वतन न्यूज पोर्टल नागपूर :-

गोंदिया – गोंदिया आमगाव तालुक्यातील गोरठा येथील (११) वर्षीय मुलगी चांदणी दिनेश पाथोडे ही दसऱ्याच्या दिवशी कालव्यात वाहून गेली़. पुजारीटोला धरणातून निघालेल्या कालव्याच्या २६ किलोमीटर अंतरावरील जवरी गावाजवळील भूमिगत सायफन पुलात गावक-यांच्या व शासकीय यंत्रणेच्या अथक प्रयत्नानंतर सोमवारी रात्री दरम्यान चांदनीचा मृतदेह मिळाले़. आमगाव गोंदिया मार्गावरील गोरठा येथील चांदणी पाथोडे ११ ही दस-याच्या दिवशी शारदा विसर्जन मिरवणुकीत गुलालाने रंगलेला चेहरा धुण्यासाठी लगतच्या कालव्यावर उतरता वेळीस अचानक तिचा पाय सपाटून ती कालव्यात पडली़. ती कालव्यातील पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली़ तेव्हापासून तहसीलदार, गावकरी व ढिवर समाजाच्या मदतीने कालव्यात शोध घेणे सुरु केले होते़. तीन दिवस होउन गेले तरीही रविवारी सांयकाळपर्यंत शोध न लागल्याने  गावकऱ्यांनी प्रशासन विरुध्द संताप व्यक्त केला़.
गावात सोमवारी दि. १८ सकाळी सुमारे ११ वाजता रास्ता रोको आंदोलन केले़. तहसीलदार, उपविभागीय पोलिस अधिकारी, पोलीस निरीक्षक यांनी गावकऱ्यांची समजूत घालून पुन्हा यंत्रणा तपासाच्या कामाला लावली़. जवरी गावाजवळ असलेल्या सायफन पुलात मृतदेह अडकल्याचा अंदाज वर्तविता जात होता़. परंतु पुलाला पाणी जास्त असल्याने कुणीही तिथे उतरण्यासाठी हिम्मत केली नाही़. परंतु गावक-यांनी कालव्याच्या दोन्ही बाजूला मातीचा बंधारा तयार केला व पाणी अडविले़.
पुलात पाणी असल्याने शोध पथकाला अडचण निर्माण झाली त्यामुळे गावक-यांनी मोटार पंपाव्दारे पाणी काढणे सुरु केले़. पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर बचाव पथकाला चिमुकलीचा शोध घेण्यास यश आले़. सोमवारी रात्रीच्या दरम्यान चांदणीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला़ मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर कुटुंबीयांना देण्यात आला़