Home Breaking News भरधाव वेगात येणाऱ्या दुचाकीस्वारांना चिरडले, दोन जणी जख्मी, अर्जुनी मोरगाव येथील घटना

भरधाव वेगात येणाऱ्या दुचाकीस्वारांना चिरडले, दोन जणी जख्मी, अर्जुनी मोरगाव येथील घटना

26 views
0
विदर्भ वतन न्यूज पोर्टल नागपूर ¦-

अर्जुनी मोरगाव – वडसा कोहमारा राज्यमार्गावरील मोरगाव टी – पॉइंटवर भरधाव चारचाकी गाडीने दुचाकीस्वारांना चिरडले़ ही घटना बुधवारी सकाळी साडे आठ वाजता दरम्यान घडली आहे़. यात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आलेली आहे़. या अपघातात दोघांनाही स्थानिक ग्रामिण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे़ मिळालेली माहितीप्रमाणे यात सुजुकी सेलेरियो एम एच ३५ एजी ४२५१ या चारचाकी गाडीने जनबंधू कुटुंबिय खामखुऱ्यावरून गोंदियाला जात होते़. याच राज्यमार्गावर मोरगाव टी- पाँइंटवर महागावकडून समीर जाधव नाकाडे (२०), विशाल देविदास नाकाडे (१८) रा़. ताडगाव हे एम एच ३५ एक्स ६२१८ या दुचाकीने ताडगावला परत जात होते़ दोन्ही गाडी आपआपल्या दिशेने येत होते़. राज्यमार्गावरील भरधाव वेगात मोरगाव चौकात दोन्ही वाहनांची धडक झाली़. धडक इतकी भीषण झाली की दुचाकीला चारचाकी कारने सुमारे ७० फुट पर्यंत फरफटत नेले़. या दुर्घटनेत दुचाकीस्वारकांची स्थिती अतिशय गंभीर आहे़. दोघांनाही जवळच्या स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले़ कारमध्ये जनबंधू कुंटुबिय सुरक्षित आहे तर दुचाकीत असलेले विशाल नाकाडे यांची स्थिती गंभीर असल्याची माहिती समोर आलेली आहे़. मात्र कारचे मोठे नुकसान झाले आहे़. भरचौकात शेकडो लोकांची गर्दी बघण्यासाठी उमटली होती़ माहिती मिळताच ठाणेदार चंद्रकांत सूर्यवंशी, पोलिस उपनिरीक्षक सोमनाथ कदम हे चमूसह घटनास्थळी दाखल झाले़ अर्जुनी मोरगाव पोलिस तपास करीत आहेत़.