Home नागपूर कश्मीर मध्ये भारतीय सेनेच्या वीर शहीद जवानांना आप ची श्रदांजली

कश्मीर मध्ये भारतीय सेनेच्या वीर शहीद जवानांना आप ची श्रदांजली

42 views
0
विदर्भ वतन न्यूज पोर्टल नागपूर :-

नागपूर – काश्मीर मध्ये मागील ८/१० दिवसांन पासून होत असलेल्या आतंकवादी हल्ल्यात शहीत झालेल्या भारतीय सेनेच्या वीर जवानांना व आतंकवादी हल्ल्यात मारल्या गेलेल्या  ७ भारतीय हिंदु बांधवांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली

मागील २ वर्षांपासून काश्मीर मध्ये बिजेपी मोदी सरकार ने धारा 370 लागू केली आहे व कश्मीर ला केंद्र शासित प्रदेश बनवत संपूर्ण कश्मीरी नगरीकांना  संपूर्ण संरक्षण प्रदान करण्याचे आश्वाशन दिले होते परन्तु मगिल 2 वर्षा पासुन कश्मीर मध्ये मोठ्या प्रमानात आतंकवादी हल्ले वाढले आहे ज्यामधे भारतीय सेनेच्या वीर जवांनाना आपले प्राण गमवावे लागले आहे, त्यात मागिल 8/10 दिवसांन पासून कश्मीर मध्ये हिंदु बांधवाना आपले प्राण गमवावे लागले आहेत, या घटना दररोज वाढत आहे, त्यामुळे सामान्य नागरिकांन मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मोदी सरकार काश्मीर मध्ये नागरिकांना संरक्षण देण्यात सफशेल अपयशी ठरले आहे हे यावरून सिद्ध झाले आहे… ज्यामुळे दररोज आपल्या भारतीय हिंदू बांधवांना आपले प्राण गमवावे लागात आहे.

या घटनांन वर लगाम लावण्यास आपली भारतीय सेना सक्षम आहे व आतंकवाद्यानचा संपूर्ण विनाश करून काश्मिरी नागरिकांना संपूर्ण संरक्षण देण्यात सक्षम आहे त्यामुळे अपयशी मोदी सरकार ने भारतीय सेनेला आतंकवाद्यांचा संपूर्ण विनाश करण्याची मुभा प्रदान करत आपल्या पदाचा व गृह मंत्री अमित शहा यांचा तातडीने राजीनामा द्यावा अशी मागणी आम आदमी पार्टी युवा आघाडी विदर्भ संयोजक पियुष आकरे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

भारत मातेच्या रक्षणासाठी आपले सर्वोच्च बलिदान देणाऱ्या भारतीय सेनेच्या वीर शहीद जवानांना व आतंकवादी हल्ल्यात  शहीद झालेल्या भारतीय नागरिकांना आम आदमी पार्टी युवा आघाडी नागपूर तर्फे महाल बडकस चौक येथे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

यावेळी आप युवा आघाडी विदर्भ संयोजक श्री पियुष आकरे, राज्य समिती सदस्य सौ. कृतल आकरे, गिरीश तितरमारे, विशाल चौधरी, पार्थ मिरे, हेमंत पांडे, दीपक भातखोरे, स्वप्नील सोमकुवर, प्रियंका तांबे, पंकज मेश्राम, हरीश वेळेकर, शुभांगी वेळेकर, प्रभात अग्रवाल, विषाखा दुपारे, लक्षिकांत दांडेकर, किशोर चीमुरकर, अभय भोयर, गौतम कावरे, पुष्पा ढाबरे, आकाश वैद्य, मृणाली वैद्य, सचिन कांबळे, प्रदीप पौनिकर, नरेश देशमुख, संजय बारापात्रे सह मोठ्या संख्येने आप युवा कार्यकर्ते सहभागी होते.