
विदर्भ वतन न्यूज पोर्टल नागपूर :-
श्री गणेश मंदिर टेकडी यांच्या विद्यमान कार्यकारिणीच्या धोरणात्मक दृष्टीने राष्ट्रीय धोरणानुसार “गोशाळा उपक्रम ” राबविण्यासाठी एकमतांनी निर्णय घेतलेला आहे. श्री गणेश मंदिर टेकडी नागपूर शहरवासियांकरीता आराध्य दैवत आहे. मंदिरात भक्तांकडून येणाऱ्या दान राशीतून कार्यकारणीत विविध प्रकारचे धार्मिक सामाजिक कार्य सातत्याने करीत असते. मंदिराला प्राप्त झालेली 5 एकर जागा झिल्पी मोहगाव येथे आहे. प्राप्त जागेवर नक्षत्रवन, पर्यटन क्षेत्र निर्मितीचे कार्य सातत्याने सुरू आहे. कार्यकारिणीने जागेच्या उपयोगीतिच्या दृष्टीने गोसंवर्धन बुद्धिवंत करण्याचा उद्देश, गोशाळा उपक्रम राबवणे सुनिश्चित केले आहे. १ नोव्हेंबर 2021 रोजी सोमवारला वसुबारस पूजनाच्या दिवशी गोशाळेच्या उद्घाटनाचा सोहळा मंदिर परिसरात करण्यात येणार आहेत. गणेश मंदिर परिसरात गाईची पूजन दुपारी साडेबारा वाजता नंतर आरती करण्यात येईल कृपया गणेश भक्तांनी व भक्तांनी पूजनाचा लाभ घ्यावा. ह्या प्रकल्पाचे उत्तरदायित्व संस्थेचे सभासद अरुण कुलकर्णी कोषाध्यक्ष, दिलीप शहाकार जबाबदारीने पाहणार आहे. संस्थेचे अध्यक्ष विकास लिमये, उपाध्यक्ष श्रीराम कुलकर्णी, सचिव संजय जोगळेकर, सहसचिव अरुण व्यास, विश्वस्त हरी लक्ष्मण भालेराव, अँड. श्री शांती कुमार शर्मा, माधव कोहळे, संपूर्ण कार्यकारी मंडळ याउपक्रमात भाग घेणार आहेत. व गोशाळा उपक्रम राबविण्यास वचनबद्ध आहे. असे एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

