नागपूर पोलिसांनी वाहन चोराट्यांचा रॅकेट पकडले, आठ दुचाकी जप्त

167

विदर्भ वतन न्यूज पोर्टल नागपूर :-

शहरातून सतत दुचाकीची चोरी होत असल्यामुळे गुन्हे शाखा पोलिसांनी सापळा रचून पाच चोरट्यांना अटक केली़ चोरट्यांकडून ३ लाख ४ हजार रुपयांची वाहने जप्त केली़ या टोळीने शहर आणि ग्रामीण भागातूनही दुचाकी चोरी केल्या होत्या़ पोलिसांनी चोरीच्या आठ दुचाकी जप्त केल्या असून आणखी काही दुचाकी मिळण्याची शक्यता आहे़. गेल्या १३ आँक्टोबर रोजी नंदनवन हद्दीतून एक वाहन चोरीला गेले होते़ पीआय विश्र्वनाथ चव्हान यांनी खबºयाने दिलेल्या माहितीवरुन पोलिसांनी सौरभ उमेश ब्रम्हे (१९) आणि संजय शंकर अधिकारी (२०) यांना पकडले होते़ त्यांच्या ताब्यातून चोरीची ऍक्टिवा जप्त करण्यात आली़. त्यांची सखोल विचारपूस केली असता दीपक रमेशनाथ परिहार (३३) यांच्यासह दुचाकी चोरल्याची कबुली दिली़. चोरलेल्या दुचाकी सिवनी जिल्ह्यात दहा ते बारा हजारात विकल्याची त्यांनी कबुली दिली़ या चोरांनी नंदनवन, प्रतापनगर, हुडकेश्वर, रामटेक, अंबाझरी, बेलतरोडी येथून वाहने चोरल्याची कबुली दिली़ पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून चोरीची ८ वाहने जप्त केली़