विदर्भ वतन न्यूज पोर्टल नागपूर:-
पौर्णिमेचा चंद्र कविता
==============
निल अंबरी चंदेरी
चंद्र सखा पूर्ण दिसे
कोजागिरी पौर्णिमेला
दुधा मध्ये चंद्र हसे
झाली रंगीत अवनी
शुभ्र चंदेरी चंदेरी
वेडावल्या चांदण्याही
वर आकाशी मंदिरी
पौर्णिमेच्या श्वेत रात्री
रास खेळती चांदण्या
दिसे पूर्ण चंद्रावर
काळ्या पुसट डागण्या
अमर्याद सागरास
येते या दिनी भरती
प्रेमिकांना खुनावती
याच मंद धुंद राती
खुले रातराणी फुले
मंद उजेडात छान
पुनवेस चंद्रसखा
शोभे भारी रूपवान
श्री.युवराज गोवर्धन जगताप
    काटेगाव ता :- बार्शी
    जिल्हा :- सोलापूर
    8275171227

You missed