महाविकास आघाडीची बदनामी करणा-या भाजपला सरकारमधील सर्व मंत्र्यानी उत्तर घावं – संजय राऊत

149

विदर्भ वतन न्यूज पोर्टल नागपूर :-

भाजपला सरकारमधील सर्व मंत्र्यांनी उत्तर द्यावं, असं आवाहन शिवसेनेचे खासदार संजय राऊत
‘भारतीय जनता पक्षाकडून महाविकास आघाडीच्या सरकारवर जी बदनामी केली जात आहे, प्रतिमाहनन करण्याचा प्रयत्न सुरू आहे, ते रोखण्याची जबाबदारी सरकारमधील सर्व मंत्र्यांची आहे. त्यांनी आता केवळ खुर्च्यांवर बसू राहू नये. प्रतिहल्ले करावेत,’ असं आवाहन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज केलं.  मुंबईत ते पत्रकारांशी बोलत होते. दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या भाषणावर विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून चौफेर टीका केल्या जात आहे . त्या पार्श्वभूमीवर त्यांनी भाजपवर तोंडसुख घेतले. ‘मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर व आघाडीच्या नेत्यांवर खालच्या दर्जाची टीका सुरू आहे. कमी प्रतीचा गांजा विरोधकांनी मारल्यामुळं अशा प्रकारे टीका केली जात आहे,’ असा संताप राऊत यांनी व्यक्त केला. महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनाही प्रतिउत्तर देत खडे बोल सुनावले.

‘सरकारवर होणाऱ्या टीकेला केवळ शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सुप्रिया सुळे किंवा संजय राऊत यांनीच उत्तर द्यायचं का? सत्तेत बसलेल्या व सत्ता भोगणाऱ्या सर्वांची ती जबाबदारी आहे. महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी आता शांत बसू नये. हल्ल्या प्रतिहल्ला आणि टोल्याला प्रतिटोला हाणावा. किंबहुना आता सर्व मंत्र्यांना बोलावंच लागेल. तसं झालं तर भाजपवाले आठ दिवसांत पळून जातील,’ असं संजय राऊत म्हणाले.

संजय राउत केंद्र सरकावर हल्ला साधला

जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीवरूनही राऊत यांनी केंद्र सरकारवर हल्ला चढवला. रोजच्या रोज काश्मिरी पंडित, शीख नागरिक व बिहारी मजुरांचे खून होत आहेत.’जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती चिंताजनक आहेत. केंद्रीय गृहमंत्र्यांनी यावर खुलासा करायला हवा,’ अशी मागणी राऊत यांनी केली. ‘महाराष्ट्रातील नेत्यांच्या व मंत्र्यांच्या विरोधात उठसूट आरोप करणारे किरीट सोमय्या व छापे टाकणाऱ्या ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय व एनसीबीसारख्या संस्थांना जम्मू-काश्मीरमध्ये पाठवा. त्यांना दहशतवाद्यांची संपूर्ण माहिती द्यायला, कागदपत्रे द्यायला आम्ही तयार आहोत,’ असं राऊत उत्तर दिले.