Home महाराष्ट्र अजित पवार घोटाळा, ७० छापे आणि १८४ कोटींचे बेनामी व्यवहारावर छापेमारी –...

अजित पवार घोटाळा, ७० छापे आणि १८४ कोटींचे बेनामी व्यवहारावर छापेमारी – किरीट सोमय्यांचं ट्वीट

71 views
0

विदर्भ वतन न्यूज पोर्टल नागपूर :-

प्राप्तिकर विभागाकडून नुकतीच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांशी संबंधित कारखान्यांच्या संचालक तसंच नातेवाईकांच्या घरावर छापेमारी कारवाई करण्यात आली. साताऱ्यातील जरंडेश्वर साखर कारखान्यासोबतच दौंड शुगर, आंबलिक शुगर, पुष्पदनतेश्वर शुगर, नंदुरबार या खासगी साखर कारखान्यांवर कारवाई करण्यात आली आहे. हे सर्व साखर कारखाने अजित पवारांच्या निकटवर्तीयांचे आहेत. दरम्यान याशिवाय मुंबईच्या दोन रिअल इस्टेट व्यवसाय समूहांवरही कारवाई करण्यात आली आहे. या  छापेमारीत एकूण १८४ कोटी रुपयांची  मालमत्ता सापडली आहे. ७ ऑक्टोबर रोजी मुंबई, पुणे, बारामती, गोवा आणि जयपूर येथील ७० ठिकाणी छापेमारी करण्यात आली  अशी माहिती केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने दिली आहे.  किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा अजित पवारांवर निशाणा साधला आहे. किरीट सोमय्या यांनी ट्वीट करत अजित पवार घोटाळा असा उल्लेख केला आहे. सोबत त्यांनी कारवाईबद्दल माहिती देताना म्हटलं आहे की, “नऊ दिवसांचे आयकर छापे..मुंबई, पुणे, बारामती, गोवा आणि जयपूर… ७० ठिकाणी छापे. १००० हून अधिक कोटींचे जमीन, सदनिका, ऑफिस, साखर कारखाने….कोट्यवधी रुपये रोख आणि ज्वेलरी…184 कोटी बेनामी संशयास्पद व्यवहार”. छापेमारी दरम्यान गोळा केलेल्या पुराव्यामुळे प्रथमदर्शनी अनेक बेहिशेबी आणि बेनामी व्यवहार उघड झाले आहेत.

दोन्ही व्यवसाय समुहांकडून सुमारे १८४ कोटीच्या बेहिशेबी उत्पन्नाचा पुरावा देणारी धक्कादायक कागदपत्रे सापडली आहेत,” असे सीबीडीटीने म्हटलं आहे. मात्र, त्यांनी संबंधित संस्थांचे नाव निवेदनात उघड केलेलं नाही. तसंच या छापेमारी दरम्यान २.१३ कोटींची बेहिशेबी रोकड आणि ४.३२ कोटी रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. तसंच या कंपन्यांचे काही आर्थिक व्यवहार संशयास्पद असल्याचंही म्हटलं आहे