Home Breaking News  १ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त

 १ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त

0
 १ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त

विदर्भ वतन, नागपूर- बुटीबोरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीणचे पथक पेट्रोलिंग करीत असताना पोलिस निरीक्षक अनिल जिट्टावार यांच्याकडून गांजाची ट्रकमधून तस्करी होत असल्याची खात्रीशिर मिळालेल्या माहितीनुसार नाकाबंदी करून तब्बल १ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त करून आरोपींना गजाआड करण्यात आले. आरोपींमध्ये ट्रकचालक रोहीत लखन जयस्वाल (वय २५, रा. कठरा, तह. गुन्नुर जिल्हा पना, मध्यप्रदेश), वाहक सोनू कवरसिंग चव्हाण (वय ३१, रा. देवसर, तह. भिवानी, हरियाणा)
सविस्तर वृत्त असे की, ट्रक क्र. आर. जे. २७ / जी. ए. ८८0४ या मालवाहू ट्रकमध्ये अंमली पदार्थ गांजा असून, सदर ट्रक आंध्रप्रदेश येथुन निघालेला असून नागपूर मार्गे जाणार आहे. माहितीनुसार पथक पंच, इलेक्टंॉनिक वजन काट, स्टाफ, सील साहित्य व लॅपटॉप प्रिंटरसह हिंगणघाट ते बुटीबोरी मागार्ने पेट्रोलिंग व नाकाबंदीकरिता रवाना झाले. नाकाबंदीदरम्यान माहितीनुसार ट्रक हिंगणघाटकडून बुटीबोरीकडे येताना दिसून आला. खात्री झाल्याने ट्रक थांबवून ट्रकची पंचासमक्ष झडती घेतली असता ट्रकमध्ये कोकोबिन्स (कॉफी बिया)चे ३६५ बॅगच्या आतमध्ये ४0 चुंगड्यांमध्ये अंमली पदार्थ ओलसर वनस्पती गांजा वजन ११0४ किलो एकूण किं. १,१0,४0,000 रुपये अवैधरित्या वाहतूक करताना मिळून आला. ट्रक चालक रोहीत लखन जयस्वाल (वय २५, रा. कठरा, तह. गुन्नुर जिल्हा पना, मध्यप्रदेश), वाहक सोनू कवरसिंग चव्हाण (वय ३१, रा. देवसर, तह. भिवानी, हरियाणा) हे मिळून आले. त्यांचेकडे मिळुन आलेल्या गांजा बाबत विचारपुस केली असता सदर गांजा तेलंगानामधील खम्मम या भागातून भरलेला असून, सदर गांजा हा पंजाब येथे देणार होतो, असे आरोपीने सांगितले.
सदरची कार्यवाही पोलिस अधीक्षक (ग्रामीण) राकेश ओला, अपर पोलिस अधीक्षक राहुल माकणीकर यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल जिट्टावार, सपोनि राजीव कर्मलवार, जितेंद्र वैरागडे, पोउपनि जावेद शेख, पोहवा गजेंद्र चौधरी, महेश जाधव, नरेंद्र पटले, पोना रामा आडे, सत्यशिल कोठारे, राजेश रेवतकर, आशिष मुंगळे, किशोर वानखेडे, पोशि महेश बिसने, अमृत किनगे, रोहन डाखोरे, चालक चासफौ साहेबराव बहाले, चापोकाँ आशुतोष लांजेवार यांनी पार पाडली.