Home Breaking News वीज पडून दोन युवक ठार तर एक किरकोळ जखमी

वीज पडून दोन युवक ठार तर एक किरकोळ जखमी

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/12814*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

433 views
0

विदर्भ वतन,खापरखेडा-परिसरातील चनकापूर चमत्कारी हनुमान मंदिरासमोर असलेल्या मैदानावर शुक्रवारी (१0 सप्टेंबर) सायंकाळी पाचच्या सुमारास

झाल्याची घटना घडली. सदर घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तन्मय सुनील दहीकर (वय १७) व अनूज कुशवाह (वय २१) अशी दोन्ही मृतकांची नावे असून, चनकापूर वेकोलि वसाहतीतील रहिवाशी आहेत. तर सक्षम सुमित गोटफोडे (वय १३) रा. पाचपावली, नागपूर असे किरकोळ जखमी बालकाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, मृतक तन्मय हा महाराष्ट्र विद्यालय ज्युनिअर कॉलेज, खापरखेडा येथील १२ वी विज्ञान शाखेचा विद्यार्थी होता. सदर घटनेत मृतक व जखमी चनकापूर मैदानावर पावसातच फुटबॉल खेळत होते, अशी माहिती मिळाली. खापरखेडा परिसरात सव्वा चारच्या दरम्यान विजेच्या कडकटासह मुसळधार पाऊस झाला. पाच वाजताच्या सुमारास पाऊस कमी झाल्यानंतर फुटबॉल खेळत असताना अचानक वीज पडून दोघांचा घटनास्थळी मृत्यू झाला तर तिसरा तेरा वर्षीय मुलगा किरकोळ जखमी होऊन सुदैवाने वाचला. जखमी हा चनकापूर वेकोलि वसाहत येथे मिलिंद ढोरे यांच्याकडे पोळा सण साजरा करण्याकरिता आला होता. तो वीज पडून जखमी झाला. सदर जखमीला उपचारार्थ मेयो रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार सुरू आहे.