पैशाच्या वादावादीत युवकाचा खून

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/12810*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

388

विदर्भ वतन, उमरेड-उमरेड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रेल्वे झोपडपट्टीत पैशांच्या वाटणीतून झालेल्या क्षुल्लक कारणावरून वाद उद्भवला. रागाच्या भरात आरोपींनी घरातच रेल्वेरुळाच्या लोखंडी तुकड्यावर डोके आपटून ठार केले. रात्रभर प्रेत घरीच ठेवले. त्यानंतर दुसर्‍या दिवशी पहाटे मृतदेह पोत्यात भरून तो सायकलवरून नेला आणि प्रेत पुरल्याचा प्रकार शक्रवारी (१0 सप्टेंबर) नागरिकांच्या सतर्कतेमुळे तब्बल पाच दिवसानंतर उजेडात आला. ग्याना रूपराव शेंडे (२३, रा. रेल्वे झोपडपट्टी, उमरेड) असे मृताचे नाव आहे.
याप्रकरणी उमरेड पोलिसांनी विजय ऊर्फ गोलू सखाराम मांडले आणि त्याचा भाऊ सुरजित सखाराम मांडले (रा. झोपडपट्टी, उमरेड) या दोन आरोपींना अटक केली आहे. रविवारी, ५ सप्टेंबर दुपारी ४ वाजताच्या दरम्यानची ही घटना असून, उमरेड सेवामार्गावरील आंबराई परिसरातील एका निर्जनस्थळी असलेल्या केबल वायरच्या खड्डय़ात प्रेत पुरण्यात आले होते. मृत ग्याना शेंडे हा लोखंडी साहित्याची जुळवाजुळव करत विक्री करण्याचा धंदा करत होता. आरोपी गोलू व सुरजित मांडले माती खोदकाम करतात. सदर दोन्ही भाऊ मृत ग्यानाचे मित्र होते. तिघेही लोखंडी साहित्याची आपसात वाटाघाटी करत विल्हेवाट लावायचे. रविवारी, ५ सप्टेंबरला दुपारच्या सुमारास आरोपी गोलू आणि सुरजित यांच्या घरी मृत ग्याना शेंडे हा पार्टी करीत होता. याचदरम्यान वाटाघाटीच्या पैशांवरून ठिणगी उडाली आणि दोन्ही आरोपी भावांनी ग्याना शेंडे याला ठार मारले, अशी माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी भीमराव टेळे यांनी दिली. उमरेड पोलिस ठाण्यात ३0२, २0१, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, याप्रकरणी आरोपींची संख्या वाढण्याची संभावना व्यक्त होत आहे. घटनास्थळी फॉरेन्सिक चमू पोहोचत नमुने घेण्यात आले. शुक्रवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास नागरिकांनी पोलिस ठाणे गाठले. नागरिकांनी खून झाल्याचा संशय व्यक्त करीत निवेदन दिले. आरोपींची नावेही सांगितली.अशातच पोलिसांची एक चमू संशयित आरोपींना पकडण्यासाठी रवाना करण्यात आले. लागलीच सहा जणांना ठाण्यात आणले. पोलिसी खाक्या दाखविण्यात आला. दोन्ही आरोपींनी गुन्हा कबूल केला.