खडकी/डोंगरगाव येथे अंगावर भिंत कोसळून महिलेचा मृत्यू

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/12800*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

119

विदर्भ वतन,तिरोडा- तालुक्यातील खडकी/डोंगरगाव येथे अंगावर भींत कोसळून महिलेचा मृत्यू झाल्याची घटना आज, ९ सप्टेंबर रोजी सकाळी साडेसहा वाजता घडली. धनवंता रवींद्र भलावी (३९) असे मृत महिलेचे नाव आहे.
गावात पहाटेपासून जोरदार पाऊस सुरु होता. यावेळी मृतक महिला आपल्या पती व एका मुलीसह घरात होते. तर दोन मुली मामाच्या गावाला गेले होते. आज सकाळी पतीपत्नी स्वयंपाक खोलीत न्याहारीची तयार करीत होते, तर मुलगी दुस-या खोलीत होती. दरम्यान, महिलेने पतीला भांडे घेण्यासाठी बाहेर पाठविले. व त्याच वेळी पावसामुळे कमकुवत झालेली भींत तिच्या अंगावर पडली.
दरम्यान महिलेच्या पतीने आरडाओरड केली असता परिसरातील नागरिकांनी धाव घेऊन पडलेल्या भींतीचा मलबा काढून तिला बाहेर काढले. तिच्यावर डाकराम सुकडी प्राथमिक आरोग्य केंद्र प्राथमिक उपचार केल्यावर तिरोडा उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केले. या घटनेने गावात एकच हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, काँग्रेसचे अनुसूचित विभाग तालुकाध्यक्ष हितेंद्र जांभूळकर यांनी मृतकाच्या कुटूंबीयांना दहा लाख रुपयांची आर्थिक मदत तत्काळ देण्याची मागणी केली आहे.