फक्त पन्नास रुपयासाठी घेतला जीव

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/12795*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

406

विदर्भ वतन,देवरी-स्थानिक पंचशील चौकात ५0 रूपयाच्या देवाण-घेवाणातून झालेल्या वादात एका युवकाने कु-हाडीने घाव घालून इसमाची हत्या केली. ही घटना काल (ता.८) रात्री ७ वाजता सुमारासची आहे. बच्चनगिरी दौलतगिरी गुंडी (५७) रा.भागी असे मृताचे तर कुणाल रामेश्वर कांबळे (१८) रा.पंचशील वॉर्ड देवरी असे आरोपीचे नाव आहे.
पोलिस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील भागी येथील बच्चनगिरी दौलतगिरी गुंडी व त्याचा मित्र असे दोघे जण पंचशिल चौकात राहणा-या रामेश्वर कांबळे यांच्याकडे आले होते. दरम्यान ५0 रुपयाच्या देवाणघेवाणावरून रामेश्वर कांबळे याच्यासोबत भांडण झाले. भांडण होत असताना रामेश्वरचा मुलगा कुणाल कांबळे (१८) याने घरात ठेवलेल्या कु-हाडीने बच्चनगिरी गुंडी यांच्यावर वार करून प्राणघातक हल्ला केला. यानंतर बच्चनगिरी हा घटनास्थळीच रक्ताच्या थारोळ्यात पडला. तर दुसरीकडे बच्चनगिरीचा मित्र जीव वाचविण्याच्या नादात घटनास्थळावरून पसार झाला. चौकात घडलेल्या घटनेची माहिती परिसरातील नागरिकांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमी बच्चनगिरी गुंडी याला त्वरित उपचारासाठी स्थानिक ग्रामीण रूग्णालयात हलविले. मात्र, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने गोंदिया येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात हलवित असताना रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद देवरी पोलिस ठाण्यात करण्यात आली असून आरोपी कुणाल कांबळे विरूध्द हत्येचा गुन्हा नोंद करीत त्याला अटक करण्यात आली आहे.