Home Breaking News भिंतीच्या मलब्यात दबून पती-पत्नीचा मृत्यु

भिंतीच्या मलब्यात दबून पती-पत्नीचा मृत्यु

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/12791*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

103 views
0

-संततधार पावसाने कोसळली भिंत
विदर्भ वतन,वर्धा-संततधार पावसामुळे घराची भिंत पडल्याने दाम्पत्याचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दहेगाव गोंडी येथे पहाटेच्या सुमारास घडली. रामकृष्ण चौधरी (वय ४५) व ज्योती चौधरी (वय ३५) असे मृत पती-पत्नीचे नाव आहे. या घटनेत मुलगा आदित्य गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे.
रात्रभर सुरू असणा-या संततधार पावसामुळे घराची मातीची भिंत खचली. मध्यरात्री झोपेत असलेल्या चौधरी कुटुंबीयांच्या अंगावर घराची भिंत कोसळली. यात ज्योती चौधरी मातीच्या मलब्यात दबल्या गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तर पती रामकृष्ण चौधरी व मुलगा आदित्य चौधरी याला सामान्य रुग्णालय जात असताच पती रामकृष्ण चौधरी यांच्यावर काळाने आघात केला. तर मुलगा आदित्य याच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालय वर्धा येथे उपचार सुरू आहे. त्याची प्रकृती सुद्धा चिंताजनकच असल्याची माहिती समोर येत आहे. परिसरातील नागरिकांनी शर्थीचे प्रयत्न करून मातीच्या ढिगा-याखाली दबलेल्या चौधरी कुटुंबीयांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल होेऊन घटनेचा पंचनामा केला. या घटनेमुळे दहेगाव गोंडी या गावात शोककळा पसरली असून परिसरात घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.