राज्यातील पोलिस अधिकारी इकडून तिकडे

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/12787*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

121

विदर्भ वतन,नागपूर-गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिका-यांच्या बदल्यांचा मुहूर्त अखेर निघाला आहे. गुरुवारी, ९ सप्टेंबर रोजी गृह विभागाने ३१ आयपीएस अधिका-यांसह ५४ पोलिस उपायुक्त /अपर अधीक्षक तसेच ९२ साहाय्यक पोलिस आयुक्त, उपायुक्तांच्या बदल्या केल्या आहेत. या बदल्यांमध्ये ६ सहाय्यक अधीक्षकांना पदोन्नती देण्यात आली आहे. नागपूरसह वाशीम, अमरावती धुळे, नंदुरबार जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. नागपूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक राकेश ओला यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर येथे बदली करण्यात आली आहे. तर राज्य गुप्तवार्ता विभागाचे उपायुक्त विजय मगर हे नागपूर राज्यातील पोलिस अधिका-यांच्या बदल्या
ग्रामीणचे पोलिस अधीक्षक असतील. यापूर्वी नागपुरात कार्यरत असलेले व सध्या धुळ्याचे पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित यांची पुन्हा नागपुरात पोलिस उपायुक्तपदावर बदली करण्यात आली आहे. वाशीमचे पोलिस अधीक्षक वसंत परदेशी यांची पुणे येथे, नागपुरातील परिमंडळ २ येथे कार्यरत पोलिस उप आयुक्त विनीता साहू यांची पुणे येथे तर परिमंडळ ५ चे पोलिस उपआयुक्त निलोत्पल यांची मंबईत बदली करण्यात आली आहे. गडचिरोलीचे अपर पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया यांची पोलिस उपायुक्त नागपूर शहर या पदावर बदली करण्यात आली आहे. औरंगाबादचे पोलिस अधीक्षक अविनाश बारगल यांची अमरावती ग्रामीणचे पोलिस अधीक्षक या पदावर बदली करण्यात आली आहे. मुंबईच्या गुन्हे शाखेत कार्यरत श्रीकांत परोपकार यांची नागपुरातील पोलिस प्रशिक्षक केंद्राच्या प्राचार्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. बच्चन सिंह हे वाशीमचे पोलिस अधीक्षक असतील.
चंद्रपूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी शिलवंत नांदेडकर यांची औरंगाबाद येथे, वरोरा उपविभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी निलेश पांडे यांची मोर्शी (अमरावती) येथे, गोंदिया जिल्ह्यातील आमगाव उपविभागातील उपविभागीय पोलिस अधिकारी जालिंदर नालकुल यांची बाश्री (सोलापूर) येथे, बुलडाण्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी रुमेश बरकते यांची उमरगा (उस्मानाबाद) येथे, नागपूर ग्रामीणमधील रामटेक उपविभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी नयन आलूरकर यांची सहायक पोलिस आयुक्त नागपूर शहर या पदावर बदली करण्यात आली आहे. यवतमाळच्या उपविभागीय पोलिस अधिकारी माधुरी बाविस्कर यांची सहायक पोलिस आयुक्त नागपूर शहर येथे, नागपूरातील सहायक पोलिस आयुक्त नंदनवार यांची उपविभागीय पोलिस अधिकारी चंद्रपूर या पदावर, नागपुरातील सहायक पोलिस आयुक्त केशव शेंगळे यांची बृहन्मुंबई येथे, नागपूर ग्रामीणचे उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र चव्हाण यांची रामटेक येथे उपविभागीय पोलिस अधिकारी या पदावर, मोर्शी उपविभागाच्या उपविभागीय अधिकारी कविता फडतरे यांची नाशिक येथे, तिरोड्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन यादव यांची बृहन्मुंबई येथे, नागपूरचे सहायक पोलिस आयुक्त परशुराम कार्यकर्ते यांची नानवीज (पुणे) येथे, व्यंकटेश देशपांडे यांची पुणे शहर येथे, रेखा भवरे यांची बृहन्मुंबई येथे बदली करण्यात आली आहे. भामरागडचे उपविभागीय पोलिस अधिकारी कुणाल सोनवणे यांची फैजपूर येथे, पेंढरी (गडचिरोली)येथील उपविभागीय पोलिस अधिकारी जयदत्त भवर यांची औरंगाबाद ग्रामीणमध्ये, पोलिस उपअधीक्षक संकेत गोसावी यांची कोल्हापूर येथे, बसवराज शिवपुजे यांची खेड येथे बदली करण्यात आली आहे. पुसदचे सहायक पोलिस अधीक्षक अनुराज जैन यांची लातूर येथे, चिमूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन दत्तात्रय बगाटे यांची सिंधुदुर्ग येथे बदली करण्यात आली आहे. औरंगाबादचे उपविभागीय पोलिस अधिकारी गोरख भामरे यांची वाशीम येथे अपर पोलिस अधीक्षक या पदावर बदली करण्यात आली आहे. मुलचे उपविभागीय पोलिस अधिकारी अनुज तारे यांची अपर पोलिस अधिक्षक अहेरी-गडचिरोली या पदावर बदली करण्यात आली आहे. राज्य गुप्तवार्ता विभागात नागपूर येथे कार्यरत उपआयुक्त अनिल पाटील यांची नाशिक येथे, आर्थिक गुन्हे शाखेतील पोलिस उपआयुक्त विवेक मासाळ यांची समादेशक राज्य राखीव पोलिस दल, नागपूर येथे तर (खामगाव) बुलडाणा येथील अवर पोलिस अधीक्षक हेमराज राजपूत यांची मुंबई येथे बदली करण्यात आली आहे.