Home Breaking News अनिल देशमुखांची ईडीविरोधात हायकोर्टात याचिका

अनिल देशमुखांची ईडीविरोधात हायकोर्टात याचिका

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/12783*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

22 views
0

विदर्भ वतन,वृत्तसंस्था/मुंबई-राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आता ईडीविरोधात हायकोर्टात धाव घेतली आहे. ईडीने बजावलेले समन्स रद्द करण्याची मागणी या याचिकेमध्ये करण्यात आली आहे. तसेच तपासयंत्रणा केवळ खळबळ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असून महत्त्वाची कागदपत्रे लीक केली जात असल्याचा आरोपही अनिल देशमुखांकडून करण्यात आला आहे. कोटार्ने याप्रकरणी सोमवारपर्यंत निकाल राखीव ठेवला आहे.
अनिल देशमुखांच्या वतीने वकील विक्रम चौधरी युक्तिवाद करत असून अमन लेखी यांच्यासह एसजी तुषार मेहता, एएसजी अमन लेखी आणि एएसजी अनिल सिंह अशी वकिलांची तगडी फौज ईडीची बाजू मांडली. अनिल देशमुखांना तातडीने दिलासा देण्याची गरज असल्याचे देशमुखांच्या वतीने सांगण्यात आले असून तपास यंत्रणेच्या चौकशीची गरज काय? याची माहिती देत नाहीये, तपासयंत्रणेने अद्याप ईसीआयआरची कॉपी दिलेली नाही. या प्रकरणाने तपासयंत्रणा केवळ माध्यमांद्वारे खळबळ निर्माण करू पाहतंय, असा आरोपही केला आहे. तर अनिल देशमुखांच्या याचिकेच्या वैधतेवरच सरकारी पक्षाचा आक्षेप आहे. अशाप्रकारे ही याचिका एकलपीठापुढे मांडली जाऊ शकत नाही, या याचिकेवर खंडपीठापुढे सुनावणी व्हायला हवी, असा युक्तिवाद सॉलिसटर जनरल तुषार मेहता यांनी केला आहे. दरम्यान, प्रकरण प्रलंबित असताना, ते अवाजवी खळबळ निर्माण करत आहेत, नियमांचे उल्लंघन करत आहेत आणि निवडक कागदपत्रं आणि माहिती लीक करत आहेत असा आरोप अनिल देशमुखांकडून करण्यात आला आहे.