प्रेयसीने प्रियकराचा गळा दाबून केला खून…

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/12779*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

462

विदर्भ वतन,वृत्तसंस्था,पुणे- स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीने आपल्या प्रियकराचा गळा दाबून खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सोनल पुरुषोत्तम दाभाडे ( वय ३४ रा. हिंद कॉलनी नर्सिंग डमाळे बिल्डिंग,भेकराईनगर, फुरसुंगी ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

याप्रकरणी रोहिणी रामदास यूनाते ( वय २४ रा. हिंद कॉलनी नर्सिंग डमाळे बिल्डिंग, भेकराईनगर, फुरसुंगी) हिच्याविरुद्ध प्रियकराचा गळा दाबून खून गुन्हा दाखल करण्यात आला असून, तिला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.याबाबत भाऊ निवास पुरुषोत्तम दाभाडे (वय ३० रा.मु. घोटा,ता.तिवसा जि. अमरावती) यांनी फिर्याद दिली आहे. नेमक्या कोणत्या कारणातून तरुणाचा तरुणीने खून केला हे मात्र अद्याप समोर आलेले नाही.स्पर्धा परीक्षेची तयारी करताना झालेल्या ओळखीतून आरोपी तरुणी आणि तरुण लिव्ह अँड रिलेशनशिपमध्ये राहत होते. ही घटना (दि. २९) ऑगस्टला भेकराईनगर हिंद कॉलनी येथे राहत्या घरात घडली.

याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यांमध्ये सुरुवातीला आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली होती. पोलीस तपास व शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर तरुणीने खून केल्याचा उलगडा झाला. त्यानंतर बुधवार (दि.०८) सप्टेंबरला संबंधित तरुणी विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
सोनल व रोहिणी मागील दोन वर्षांपासून भेकराईनगर येथे लिव्ह अँड रिलेशनशिपमध्ये राहत होते. दोघेही स्पर्धा परीक्षाची तयारी करत होते.

मात्र त्यांचे दोघांमध्ये छोट्या छोट्या गोष्टीवरून वाद होत होते. (दि.२९) सोनल सोबत रोहिणीचा वाद झाला. त्यामुळे रागातून रोहिणीने प्रियकर सोनलला ढकलल्याने तो भिंतीवर आपटला.त्यामुळे सोनल खाली कोसळला असता रोहिणी त्याचा गळा दाबल्याने त्याचा मृत्यू झाला.

सोनलचा अचानक मृत्यू झाल्याचे खोटी माहिती तिने पोलिसाला व सोनलच्या नातेवाईकाला दिली.दरम्यान, सोनलचा मृतदेह ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला होता.
नातेवाईकांना संशय व पोलीस तपासात आणि शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर सोनलचा खून झाल्याचे उघडकीस आले.

त्यानंतर पोलिसांनी रोहिणीवर खुनाचा गुन्हा दाखल करून तिला ताब्यात घेतले आहे.