Home Breaking News जुगार अड्डयावर धाड, 13 आरोपींसह लाखोंचा मुद्देमाल जब्त

जुगार अड्डयावर धाड, 13 आरोपींसह लाखोंचा मुद्देमाल जब्त

0
जुगार अड्डयावर धाड, 13 आरोपींसह लाखोंचा मुद्देमाल जब्त

विदर्भ वतन,यवतमाळ- जिल्हा पोलिस अधीक्षक यांना मिळालेल्या माहीती वरुन काल रात्री यवतमाळ शहरातील अवधुतवाडी पोलिस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या जाजू चौकातील राजन्ना अपार्टमेंटमध्ये पोलिसांनी धाड घालून १३ आरोपीसह लाखोंचा मुद्देमाल जप्त करून कारवाई करण्यात आली.
अवधुतवाडी पोलिस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर सुरू असलेल्या जाजु अपार्टमेंट येथील निलेश पिपरानी याच्या चौथ्या मजल्यावर फ्लॅट क्रमांक ४0१ मध्ये जुगार सुरू असल्याची माहीती गुन्हे शाखेला प्राप्त झाली. त्यावरून गुन्हे शाखेने रात्री जाजू चौकातील राजन्ना अपार्टमेंटमध्ये धाड टाकली असता आरोपी निलेश महेंद्र पिपरानी (४३) रा. राजन्ना अपार्टमेंट, मनीष रामविलास मालानी (४४) रा. बोरी अरब, सौरव शिवम मोर (४१) रा. मेन लाईन यवतमाळ, विपुल पद्माकर खोब्रागडे (१९) रा. पाटीपुरा, राहुल सुरेंद्र शुक्ला (४0), माईन्दे चौक यवतमाळ, नवल नारायण बजाज ऊर्फ अग्रवाल (५५) रा. चांदोरेनगर, प्रेमरतन ताराचंद राठी ( ४४) रा. गांधीनगर यवतमाळ, रुपेश आनंदराव कडू (४२) रा. धामनगाव रोड, सुनील हरीरामजी अग्रवाल (५३) रा. गुरुदेवनगर, लक्ष्मिकांत चंम्पालालजी गांधी (५८) रा. राजन्ना अपार्टमेंट, अनिल भवरीलालजी मानधना (५४) रा. र्शोत्री हॉस्पिटलजवळ, कमलेश अमृतलाल गंधेचा (४८) रा. माईन्दे चौक, अशोक ओंकारमल भंडारी (६0) रा. सारस्वत चौक या १३ आरोपीकडून जुगारात सुरू असलेल्या डावामधुन ५ लाख ५७ हजार रुपये रोख १६ मोबाईल किंमत १ लाख ९४ हजार रुपये दुचाकी वाहने ४ लाख रुपये असा एकूण ११ लाख ५१ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे.