अभिनेता अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचे निधन

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/12770*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

822

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था :मुंबई-बॉलिवूडचा खिलाडी कुमार अर्थात अभिनेता अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचे आज निधन झाले. याबाबतची दुःखद बातमी अक्षय कुमारने स्वतः ट्वीट करत ही चाहत्यांसोबत शेअर केली. शोक व्यक्त करत अक्षय कुमारने म्हटले आहे की, मला आज अतिव दु:ख झाले आहे. माझ्या आईने हे जग आज सोडले आणि दुसऱ्या जगात असलेल्या माझ्या वडिलांकडे गेली. दरम्यान, अक्षय कुमारची आई अरुणा भाटीया या गेल्या बऱ्याच दिवसांपासून आजारी होत्या. त्यांना काही दिवसांपूर्वी मुंबईतील पवई येथील हिरानंदानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. येथेच त्यांच्यावर उपचार सुरु होते.

अक्षय कुमारने आईच्या निधनानंतर शोक व्यक्त करत एक ट्वीट केले आहे. आपल्या ट्वीटमध्ये अक्षयने म्हटले आहे की, ती माझे सर्वकाही होती आणि आज मला असहाय्य वेदना जाणवत आहेत. माझी आई श्रीमती अरुणा भाटिया हिने आज सकाळी शांततेत या जगाचा निरोप घेतला आणि दुसऱ्या जगात माझ्या वडिलांकडे पोहोचली. तुमच्या प्रार्थनांचा मी आदर करतो. कारण मी आणि माझे कुटुंब यातून जात आहे. ओम शांती!

दरम्यान, अरुणा भाटीया यांना काही दिवसांपूर्वी मुंबईतील पवई येथील हिरानंदानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आयसीयूमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. रुग्णालयात दाखल केले त्यावेळी अरुणा यांची प्रकृती गंभीर होती. अक्षय कुमार त्यावेळी चित्रिकरणात व्यस्त होता. तो आपला आगामी चित्रपट ‘सिंड्रेला’च्या शूटिंगसाठी लंडनमध्ये होता. पण अक्षयला जशी आईच्या आजारपणाची माहिती मिळाली, तसा तो तात्काळ लंडनहून मुंबईत दाखल झाला.