महापूर आणि भूकंपाने मेक्सिको हादरले, १७ कोरोना रुग्णांचा मृत्यू

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/12752*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

522

विदर्भ वतन,वृत्तसंस्था-मेक्सिको सिटी- मेक्सिको देश महापुरानंतर आज बुधवारी सकाळी भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ६.९ इतकी होती. मेक्सिकोच्या दक्षिणेला असलेल्या अकापुल्को शहरात भूकंपाचे अधिक धक्के बसले. या भूकंपाच्या प्रभावाने दूरवर असलेल्या मेक्सिको सिटी शहरातील इमारती हादरल्या.

दरम्यान, भूकंपाच्या आधी मेक्सिकोच्या मध्य भागात आलेल्या महापुरामुळे १७ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये हॉस्पिटलमध्ये उपचार घेणा-या कोरोना रुग्णांचा अधिक समावेश आहे. मुसळधार पावसाचा सर्वांधिक फटका हिदाल्गो राज्यातील तुला शहराला बसला. येथील नदीला पूर आला आहे. यामुळे संपूर्ण शहर जलमय झाले असल्याची माहिती मेक्सिको सरकारने ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.
महापुराशी संबंधित घटनांमध्ये १७ लोकांचा मृत्यू झाला असून हे खूप दु:खदायक आहे, असेही सरकारने म्हटले आहे.