आमदार विकास कुंभारे यांच्या उपस्थितीत झाला पिवळ्या मारबतीचा दाहसंस्कार

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/12747*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

196

विदर्भ वतन, नागपूर-जागनाथ बुधवारी येथील नागोबा देवस्थान तर्फे तऱ्हाणे तेली समाजाच्या वतीने पिवळ्या मारबतीचा नाईक तलाव येथे दाहसंस्कार मंगळवारी सकाळी १०:३० वाजता करण्यात आला. यावेळी मध्य नागपूरचे आमदार विकास कुंभारे व डीसीपी माथानी यांच्या हस्ते आरती व पूजा करण्यात आली. यावेळी तऱ्हाणे तेली समाजाचे अध्यक्ष प्रकाश गौरकर यांच्या हस्ते नारळ फोडून श्री गणेशा करण्यात आला. कोरोना काळात परंपरेनुसार दरवर्षी प्रमाणे १३७ वे वर्ष असून ७ सप्टेंबर रोजी, मंगळवारी मारबत विसर्जनाचा कार्यक्रम संपन्न झाला. यामध्ये पिवळी मारबत स्वातंत्र्याच्या लढ्यात तऱ्हाणे तेली समाजाचा सिंहाचा वाटा असून देशात इंग्रजांचे जुलमी शासनाच्या विरोधात स्वतंत्रता आंदोलनात विदर्भातील तऱ्हाणे तेली समाजाचा मोठा सहभाग होता.
इग्रजांच्या अत्याचारास भारतीय जनता कंटाळल्याने प्रत्येक धर्माचे, समाजाचे, प्रौढ युवा वर्ग देशातून इंग्रजास कसे हाकलावे या विचारात असायचे. पण इंग्रजांची दडपशाही व अत्याचारी धोरणाच्या नितीमुळे एकत्रित रस्त्यावरून जनतेस जागृत करण्यास कायदेशीर बंदी होती. पण धार्मिक कार्यास थोडीफार मुभा होती. या संधीचा फायदा घेऊन तऱ्हाणे तेली समाजातील थोर विरांनी आपल्या देशाला इंग्रज नावाची लागलेली रोगराई दूर करण्याकरिता समाजातील लोकांना एकत्रित करण्याचे व समाज बांधणीचे कार्य करून मारबत उत्सवाचे कार्य सुरू करून इंग्रजांविरुद्ध समाजाने लढा पुकारला. या शास्त्रोक्त घटनेचा आधार घेऊन मारबत उत्सवाची स्थापना पोळ्याच्या दिवशी सन 1885 पासून शुभारंभ करण्याचे फार मोठे कार्य समाजाने केले. अशाप्रकारे लढ्यात तऱ्हाणे तेली समाजाने सहभाग घेऊन देशाला स्वातंत्र्य मिळण्यास फार मोठी भूमिका निभवली. राज्य सरकारच्या कोरोना नियमांचे उल्लंघन न करता विसर्जनाचा कार्यक्रम शांततेत पार पाडला. या कार्यक्रमासाठी देविदास गभणे, किशोर मालकर, मनोहर मोटघरे, धर्मेंद्र साठवणे, भास्कर तकीतकर, शुभम गबने, शुभम गौरकर, स्वप्निल भुते, अतुल भुते, भूषण खोपडे आदींचा समावेश होता. तऱ्हाणे तेली समाजाचे सहसचिव किशोर मालकर यांनी प्रसिद्धी पत्रकात ही माहिती दिली आहे.