सरकारने कडक निर्बंध जरूर लावावे परंतु पुन्हा लॉकडाऊन करू नये : प्रणव रागीट 

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/12738*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

192
विदर्भ वतन,नागपूर- सरकारने कडक निर्बंध जरूर लावावे परंतु पुन्हा लॉकडाऊन करू नये. असे प्रणव रागीट,सरचिटणीस,नैशनल काँग्रेस वर्कर्स कमिटी,महाराष्ट्र प्रदेश यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगीतले आहे. कारण लॉकडाऊनमुळे आम जनतेचे रोजगार हिरावले जातात. त्यांच्यावर उपासमारीची वेळ येते. जर सरकार लॉकडाऊनच्या वेळेस बंदोबस्तासाठी पोलीस व इतर गोष्टीवर पैसा खर्च करू शकते तर आताच नियमांचे पालन जनतेकडून करून  घेण्याकरिता सरकार का  खर्च नाही करत? जेवढे नुकसान कोरोनामुळे होत नाही तेवढे नुकसान लॉकडाऊन लावण्यामुळे होते. जर का सरकारला लॉकडाऊन  लावण्याची वेळ पडली तर सरकार ने सामान्य नागरिकांच्या या गोष्टींच्या विचार करावा .
प्रत्येक महिन्याचा किराण्याच्या, इलेक्ट्रिसिटी बिल, पाण्याचे बिल, कोणाचे बँकचे हफ्ते चालू असेल त्याचा,भाजी पाल्याचे बिल, कोणी किरायानी राहत असेल त्याचे बिल या सर्वांचा खर्च एक तर सरकारने माफ करावा अन्यथा त्याचा खर्च सरकार ने उचलावा .
जर सरकार सर्वसामान्यांचा विचार करू शकत नसेल तर आम जनता सुद्धा सरकारचा विचार करणार नाही.  निर्बंध चालेल परंतु लाकडाउन नको ?  लॉकडाउन  लावला तर येणा-या निवडणुकांत त्याचे परिणाम भोगावे लागतील असे प्रणव रागीट,सरचिटणीस,नैशनल काँग्रेस वर्कर्स कमिटी,महाराष्ट्र प्रदेश यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगीतले आहे.