Home Breaking News तिसरी लाट शहरात दाखल, नागपूरात पुन्हा कडक निर्बंध?

तिसरी लाट शहरात दाखल, नागपूरात पुन्हा कडक निर्बंध?

0
तिसरी लाट शहरात दाखल, नागपूरात पुन्हा कडक निर्बंध?

विदर्भ वतन न्युज पोर्टल, नागपूर – मागील चार ते पाच महिन्यांपासून नागपूर शहरातील जनतेला कोरोना रोगाच्या प्रतिबंधातून काही प्रमाणात दिलासा मिळालेला होता़ मात्र मागील दोन दिवसांपासून नागपूर जिल्ह्यात वाढत असलेल्या कोरोना रूग्णांची संख्या बघता आता प्रशासनाने पुन्हा कडक निर्बंधा संदर्भात वाटचाल सुरू केलेली आहे़ कोरोना रोगाच्या पार्श्वभुमिवर नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी आढावा बैठक सोमवारी विभागीय आयुक्त कार्यालयात घेतली़ या बैठकीला जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, पोलिस आयुक्तांसह अधिकाºयांचा सहभाग होता़ यावेळी कोरोना रोगाची तिसरी लाट ही शहरात दाखल होणार हे मागील दोन दिवसांच्या आकडेवारीवरून लक्षात येते असे त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना सांगितले़ काल १० रूग्णांची नोंद करण्यात आली तर सोमवारी १३ रूग्ण आढळले़
येत्या तीन ते चार दिवसांमध्ये नागपूर शहरात नागरिकांच्या सुरक्षेच्यादृष्टीने निर्बंध लावावे लागतील असे त्यांनी यावेळी सांगितले़ शहरात तिसरी लाट दाखल झालेली आहे़ हे मागील दोन दिवसांच्या रूग्यांच्या आकडेवारीवरून लक्षात येते़ त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जावू न देता आताच कडक निर्बंध लावून नागरिकांना सुरक्षा देण्याचे काम करण्यात येईल़ तसेच बार, रेस्टाँरेंट, दुकाने यासंदर्भात येत्या दोन दिवसांत निर्णय होईल़ काही प्रमाणात दुकानांच्या वेळा निश्चीत केल्या जाईल़ कोरोना रूग्णांची दुप्पट आकडेवारी व्हायच्या अगोदर प्रशासन कडक पाऊले उचलणार हे यावरून लक्षात येते़ त्यामुळे नागपूर जिल्ह्यात कडक निर्बंध लावण्यात येईल तसेच याचा निर्णय पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये घेण्यात येईल़