Home इतर मनोली येथे सुसज्ज ग्रंथालयाची स्थापना करा – स्थानिक व परिसरातील युवकांची मागणी.

मनोली येथे सुसज्ज ग्रंथालयाची स्थापना करा – स्थानिक व परिसरातील युवकांची मागणी.

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/12714*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

37 views
0

विदर्भ वतन,नवेगावबांध (अजुर्नी-मोर)-नवेगावबांध हे राष्ट्रीय उद्यान, न्यू नवेगाव नागझिरा अभयारण्य यासाठी जगप्रसिद्ध आहे. येथील वनात अनेक दुर्मिळ प्राणी, पक्षी, वनस्पती आढळून येतात. यासाठी येथील जंगले पशुपक्षी, वनस्पती अभ्यासकांसाठी कायमची आकर्षणाची राहिले आहेत. जागतिक ख्यातीप्राप्त पक्षी तज्ञ डॉक्टर सलीम अली, मारुती चितमपल्ली यांचीही ही जंगले कायमच अभ्यासाचे केंद्र राहिली आहेत. पशुपक्षांच्या येथील सुरक्षित अधिवासा मुळे हे पर्यटन केंद्र जागतिक ख्याती प्राप्त झाली आहेत. राष्ट्रीय उद्यानाच्या पर्यटन संकुलात वनाधिका-यासाठी निवासस्थाने बांधलेली आहेत. परंतु ही निवासस्थाने वापरात नसल्यामुळे नुसतेच रिकामे पडून आहेत. प्रत्येक विभागात अपडाउन ही संस्कृती निर्माण झाल्यामुळे ही निवासस्थाने रिकामी पडली आहेत. त्यामुळे जागतिक कीर्तीचे पक्षी तज्ञ व मराठी साहित्याला निसर्गाच्या समृद्धीने, मराठी साहित्याला समृद्ध करणारे मराठी भाषेला नावीन्यपूर्ण शब्दांचे दान देणारे थोर मराठी साहित्यिक व माजी वनाधिकारी मारुती चितमपल्ली मनोली नावाच्या या शासकीय निवासस्थानी राहत होते. त्यांनी वनाधिकारी म्हणून दीर्घकाळ म्हणजे ३६ वर्षे नोकरी केली. नोकरीदरम्यान आणि त्यानंतरही अशी एकूण ६५ वर्षे जंगलात काढणारे चितमपल्ली, जंगलातील प्राणिजीवन आणि त्याचे बारकावे रेखाटणारे लेखन अतिशय ओघवत्या शैलीत करतात.
हे निवासस्थान सद्यस्थितीत रिकामे पडले आहे. त्या मुळे या ठिकाणी सुसज्ज वाचनालयाची निर्मिती करावी. अशी मागणी येथील स्थानिक व परिसरातील युवकांनी केली आहे.
आजचे युग हे स्पधेर्चे युग आहे. या युगात टिकून राहण्यासाठी दिवसेंदिवस वाढणा-या बेरोजगारीवर मात करण्यासाठी स्थानिक व परिसरातील युवकांना स्पर्धा परीक्षा देणे, त्याची तयारी करणे, यासाठी एका समृद्ध वाचनालयाची गावाला गरज आहे. नवेगावबांध सारख्या ग्रामीण व आदिवासी परिसरात युवकांना ही गरज पूर्ण करण्यासाठी सुसज्ज,परिपूर्ण अशा ग्रंथालयाची गरज भासत आहे. स्थानिक ग्रामपंचायत, लोकप्रतिनिधींनी व शासनाने याकडे लक्ष द्यावे व आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पक्षीतज्ञ मारुती चितमपल्ली यांच्या पावन स्पर्श लाभलेल्या मनोली या निवासस्थानी एक सुसज्ज वाचनालय निर्माण व्हावे. अशी अपेक्षा स्थानिक व परिसरातील युवकांनी व्यक्त केली आहे. स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन पुढारी व लोकप्रतिनिधी यांनी याकडे लक्ष देऊन उद्याच्या भविष्य घडविणा?्या युवकांना ही संधी प्राप्त करून द्यावी. अशी मागणी स्थानिक व परिसरातील युवकांनी केली आहे.

आपला परिसर हा ग्रामीण व आदिवासी विभागात मोडणारा आहे. त्यामुळे आपल्या परिसरातील उदयोन्मुख युवकांना स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याच्या दृष्टीने, गरीब गरजू विद्यार्थ्यांना अभ्यासाची साधने उपलब्ध व्हावी. यासाठी एका सुसज्ज ग्रंथालयाची गावाला गरज आहे. आपल्या परिसरातील जंगले समृद्ध असून वैशिष्ट्यपूर्ण जैवविविधता विपुल प्रमाणात आहे. त्यामुळे बाहेरून येणा-या पर्यटक व निसर्ग अभ्यासकांनादेखील हे सुसज्ज ग्रंथालय मैलाचा दगड ठरेल. त्यामुळे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पक्षीतज्ञ व थोर मराठी साहित्यिक मारुती चितमपल्ली यांचा सहवास लाभलेले, मनोली हे पर्यटन संकुलातील निवासस्थान सध्या रिकामेच पडले आहे. त्यामुळे पक्षीतज्ञ मारुती चितमपल्ली यांच्या प्रेरणादायी स्मृतिप्रीत्यर्थ या ठिकाणी सुसज्ज असे ग्रंथालय उभे राहावे.यासाठी आपण प्रयत्न व पाठपुरावा करणार आहोत.
– अनिरुद्ध शहारे,
सरपंच, ग्रामपंचायत नवेगावबांध.

राष्ट्रीय उद्यानात येणारे वनाधिकारी शासकीय निवासस्थानी राहत नाही. काही अधिकारी विभागाच्या विश्रामगृहात राहतात त्यामुळे हे निवासस्थान रिकामे पडले आहे. हे असेच मोडकळीस येतील. त्यामुळे मनोली या राष्ट्रीय उद्यानाच्या पर्यटन संकुल परिसरातील मारुती चितमपल्ली यांच्या सहवास लाभलेले हे निवासस्थान त्यांच्या आठवणींचे स्मरण रहावे. यासाठी या ठिकाणी सुसज्ज अशा वाचनालयाची निर्मिती व्हावी.

-विजय डोये,अध्यक्ष, नवेगावबांध फाउंडेशन.