निर्बंधांचा मूर्तिकारांना फटका!

153

आर्थिक मदतीविना करावा लागतोय संकटांचा सामना
विदर्भ वतन वृत्तपत्र / न्युज पोर्टल, नागपूर – कोरोना रोगाने मागील दोन वर्षांपासून थैमान घातले आहे़ बाजारपेठा कधी सुरू, तर कधी बंद अशा परिस्थितीत असतांना व्यापारी वर्गासह नागरिकही धास्तावले आहे़ दुसºया लाटेच्या तीव्रतेमध्ये अनेक नागरिकांना कोरोनाची लागण झालेली होती़ अशातच शासनाने तिसºया लाटेची शंका व्यक्त केल्यानंतर पुन्हा बाजारात दहशतीचे वातावरण आहे़
जुलै महिन्यानंतर महाराष्ट्रात सणांना सुरूवात होत असते़ श्रीकृष्ण जन्माष्टमी नागरिकांनी घरच्याघरी साजरी केली असतांनाच काही दिवसांवर गणपती बाप्पांचे आगमन होणार आहे़ गणपती हा सण संपुर्ण महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो़ या सणाला मूर्तिकार वर्ग मोठ्या प्रमाणात चार महिन्यांपुर्वीच तयारीला लागलेला असतो़ सार्वजनिक तसेच घरगुती गणपतींची निर्मीती करणे, रंगरंगोटी करणे व ते बाजारात विक्रीला पाठविण्यात त्यांची दमछाक होते़ अशातच मागीलवर्षी कोरोना रोगामुळे मोठ्या प्रमाणात निर्बंध लागले असतांनाच मूर्तिकारांना आर्थिक टंचाईचा सामना करावा लागला़ याहीवर्षी शासनातर्फे सार्वजनिक गणपतींच्या स्थापनेवर निर्बंध लावण्यात आलेले आहे़ सार्वजनिक तसेच घरगुती गणपती बाप्पांची मुर्ती ही चार फुटांपेक्षा मोठी असू नये तसेच गणपतीनिमीत्त आयोजित करण्यात येत असलेल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमावरही बंदी घालण्यात आलेली आहे़
या सहा महिन्यांच्या सणांवर मूर्तिकार व त्यांचे कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो़ गणपती, नवरात्री, दिवाळी या सणांमध्ये मोठ्या प्रमाणात देवांच्या मातीच्या मूर्त्यांना महत्व असते़ आता यावर्षीसुद्धा कोरोनाचे निर्बंध लावण्यात आले असल्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा हा एक मोठा प्रश्न मूर्तिकारांपुढे उभा आहे़ कोरोना काळात मूर्तिकारांना शासनातर्फे आर्थिक मदत मिळावी अशीही मागणी करण्यात आलेली होती़ यंदाही त्यांना निराशेला पुढे जावे लागेल़
मूर्तिकारांना शासनाने आर्थिक मदत करावी!
महाराष्ट्रातील मूर्तिकारांचा मुळ व्यवसाय हा मुर्ती निर्मीती व विक्रीचा आहे़ अशातच मागील दोन वर्षांपासून कोरोना रोगाच्या निर्बंधामुळे मोठ्या प्रमाणात मूर्तिकारांना आर्थिक संकटाला पुढे जावे लागत आहे़ सणासुदीच्या दिवसांत सहा महिन्यांच्या व्यवसायात पुढील महिने कुटुंबाचा उदरनिर्वाह करावा लागतो़ मात्र मागील दोन वर्षांपासून धंदा मंद असून हवी तेवढी कमाई होत नाही आहे़ अशातच नागपूर महानगरपालिका किंवा मुख्यमंत्र्यांनी मूर्तिकारांना आर्थिक मदत करावी हिच अपेक्षा आहे़
– रवि धांडे, मूर्तिकार, नागपूर
कुटुंबाचा उदरनिर्वाह करावा कसा
मागच्यावर्षी मूर्त्या निर्माण करूनही विक्री झालेली नाही़ सोबतच त्यासाठी लागणारा खर्च हा खिशातून भरावा लागला़ यावर्षी अपेक्षा असतांना पुन्हा निर्बंधामुळे निराशा हाती लागलेली आहे़ सहा महिन्यांच्या व्यवसायातूनच वर्षभर कुटुंबाचा उदरनिर्वाह करावा लागतो़ जवळ असलेली सर्व बचतीची रक्कम खर्च झालेली आहे़ आणि यंदाही धंद्यावर मंदी असल्यामुळे पुढे कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा कसा हा एक प्रश्न डोळ्यापुढे उभा आहे़
   – मनोज कचकुडे, मूर्तिकार, नागपूर
    पीओपीच्या मूर्त्यांनी धंदा मंदावला
दोन वर्षांपासून सर्वच मूर्तिकारांना आर्थिक फटका असलेला आहे़ अशातच पीओपीच्या मूर्त्यांमुळे अनेक मूर्तिकारांच्या धंद्यांवर विघ्न आलेले आहे़ असे असतांना पीओपीच्या मूर्त्यांवर आदेश निघतात मात्र त्याची अंबलबजावणी होत नाही़ त्यामुळे शासनाने पर्यावरणाच्या दृष्टीने तसेच मुळातील मूर्तिकारांच्या दृष्टीने योग्य ती कारवाई करावी़
      – प्रविण कावरे, नागपूर