आ़ राजू पारवे यांच्या अध्यक्षतेखाली उमरेड तालुक्यातील सर्व विभागाची आढावा बैठक

150

विदर्भ वतन न्युज पोर्टल, नागपूर – उमरेड विधानसभा क्षेत्राचे आमदार राजू पारवे यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समिती उमरेड येथे पंचायत समिती, तहसील या सर्व संबंधीत विभागाचा अधिका-यांनसोबत आढावा बैठक घेण्यात आली. महाआवास योजना अंतर्गत उत्कृष्ट घराचे बांधकाम केलेल्या लाभार्थी यांचे आमदार महोदयांचा हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले. यामध्ये चांपा, परसोडी, पिपरा, आपतूर, देवळी, शेंडेश्वर उत्कृष्ठ ग्रामपंचायत म्हणून दर्जा देण्यात आला. तसेच उमरेड तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत संबंधित समस्या लक्षात घेऊन त्याच्यावर तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले. यामध्ये विद्युत पुरवठा, घरकुल, पाणी पुरवठा, नरेगाची कामे, अन्न पुरवठा, शाळे संबधित विषय, आरोग्य संबधित विषय घेण्यात आले.
यावेळी पं.स. सभापती रमेश किलनाके, उपविभागीय अधिकारी खंडाईत, जि. प. सदस्य सुनीता ठाकरे, वंदना बालपांडे, माधुरी गेडाम, राजु सुटे, पं.स. सदस्य पुष्कर डांगरे, दादाराव मांडसकर, जयश्री देशमुख, गीतांजली नागभिडकर, प्रियंका लोखंडे, तसीलदार पुंडेकर, माजी पं.स. शालू गिल्लूरकर, शिवदास कुकडकर, सुभाष मूळ, संजय ठाकरे, दिलीप भोयर, अमोल गेडाम, सतीश नागभीडकर, व सर्व संबंधित विभागाचे अधिकारी, सरपंच, सचिव कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते.