ग्राम पंचायत खैरी येथे रक्षाबंधनाचे आयोजन

145

विदर्भ वतन न्युज पोर्टल, नागपूर – ओम शांती संस्था, खैरी येथील भगिनींनी ग्राम पंचायत खैरी येथे सरपंच बंडु कापसे तसेच सर्व सदस्य व गावातील नागरिकांसह समस्त कर्मचारी यांना राखी बांधून परमात्म, एकात्मता व शांततेचा संदेश दिला. त्यात ग्रा.पं.चे सरपंच, सर्व सदस्य गण,सचिव, गावातील नागरिकांनी कार्यक्रमावेळी उपस्थित राहून या भगिनींना शुभ आशीर्वाद देऊन रक्षा करण्याचे वचन दिले़ तसेच ओम शांती संस्था, खैरीच्यावतीने रक्षाबंधनानिमीत्त आयोजित उपक्रमाचे सर्वांनी कौतुक केले़