बाभूळगाव पोलिसांनी देशीकट्टा व चार काडतुसांसह दोघांना घेतले ताब्यात

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/12665*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

349

विदर्भ वतन, बाभूळगाव-गोपनिय माहितीवरून बाभूळगाव पोलिसांनी देशीकट्टा व चार काडतुसांसह दोघांना ताब्यात घेतल्याने बाभूळगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे. बाभूळगाव तालुका जिल्ह्यात रेती तस्करीसाठी परिचित आहे. या रेतीतस्करीच्या भांडणातून एखाद्याचा गेम करण्याचा प्लॅन तर नव्हता ना? अशी शंका व्यक्त केली जात आहे. अशाच रेती तस्करीतून दोन महिन्यापूर्वी अक्षय राठोड टोळीच्या गुंडांनी परोपटे नामक तरुणाची येथील स्टेटबँक चौकात बंदुकीच्या गोळया घालून खून केला होता.
सध्या जिल्ह्यात पोलिस अधीक्षक यांच्या आदेशाने अवैध शस्त्र बाळगणारे इसमांविरुध्द कारवाई विशेष मोहीम सुरू आहे. त्या अनुषंगाने दि. २८ आॅगस्ट रोजी रात्री बाभूळगाव शहरात पोलिस पेट्रोलिंग करीत असताना त्यांना गोपनिय बातमीदाराकडून माहिती मिळाली की, बाभूळगाव आठवडी बाजार परीसरात दोन इसम देशी बनावटी पिस्टल घेऊन गुन्हा करण्याच्या इराद्याने फिरत आहेत, त्यावरून सहा.पो.निरीक्षक, संदिप पाटील व पोस्टे स्टॉप हे आठवडी बाजार परिसरात गेले असता तेथे सराईत गुन्हेगार अनिकेत विलासराव गावंडे (वय २५) रा. नेताजी चौक, बाभुळगावं व त्याचा साथीदार शेख फारुख शेख कदीर (वय २१)रा. शिवाजी चौक, बाभूळगाव हे संशयास्पदरित्या फिरत असताना आढळले. त्यांची अंगझडती घेतली असता आरोपी अनिकेत गावंडे याच्याकडे एक देशी बनावटीचे पिस्टल (देशी कट्टा) व 0२ जिवंत काडतूस व आरोपी शेख फारुख शेख कदीर याचेकडे 0२ जिवंत काडतुस मिळून आले यावरुन दोन्ही आरोपी विरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास स.पो.नि, संदीप पाटील हे करीत आहे. सदर आरोपींना आज रोजी न्यायालयात हजर केले असता आरोपींना एक दिवसाची पोलीस कस्टडी सुनावली आहे. सदरची कार्यवाही स.पो.नि. संदिप पाटील, पोहेकॉ. अशोक गायकी, पोलिस अंमलदार, रवी इरतकर, सागर बेलसरे, पवन नांदेकर यांनी केली.